रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन यांना निवेदन सादर
बीड दि.१५ ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड, तर औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगार प्रतिनिधी वैजनाथ पिराजी पतंगे यांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत याकरिता 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. चौथ्या दिवशी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर लक्ष वेधून तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.
त्या वर त्यांनी घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना लवकरच किमान वेतन व सोई सुविधाचा लाभ मिळेल तर औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचा विषय पहिल्यांदा माझ्या समोर आला आहे. याची माहिती घेऊन तेथील वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
जर दिनांक:- 20/08/2026 पर्यंत न्याय मिळवून दिला नाही तर शुक्रवार दिनांक:- 21/08/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या दालना समोर अन्नत्याग उपोषण कर्ते वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पिराजी पतंगे टोकाची भूमिका घेतील तर घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाई राजेशकुमार जोगदंड जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या दालना समोर टोकाची भूमिका घेतील असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
सदरील निवेदन कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली वीज कामगार प्रतिनिधी वैजनाथ पिराजी पतंगे व घनकचरा व्यवस्थापनातील कामगार प्रतिनिधी अनिता बचुटे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
अशी माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे
कळविले आहे.
Comments
Post a Comment