बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित; हेल्पलाइन नंबर जाहीर
बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित; हेल्पलाइन नंबर जाहीर
बीड प्रतिनिधी :-बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यदायी सेवेसाठी आणि तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी 'उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष' आणि मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड जिल्हा यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सुरू करण्यात आले आहे.
या वैद्यकीय सहायता कक्षामुळे गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक मदत मिळवणे नागरिकांना अधिक सोपे होणार आहे. गरजू रुग्णांना थेट आणि जलद मदत मिळावी यासाठी विशेष हेल्पलाइन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे.
हेल्पलाइन नंबर: 9657355113
जिल्ह्यातील गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय मदतीसाठी अथवा उपचारासंबंधित माहितीसाठी या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment