मुधापुरी येथील मंदिरासाठी डॉ. शिवाजी दिवान यांच्याकडून इनव्हर्टर भेट


​गेवराई प्रतिनिधी:गेवराई तालुक्यातील मुधापुरी येथील मंदिरामध्ये विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी डॉ. शिवाजी गोविंदराव दिवान यांच्यातर्फे इनव्हर्टर भेट देण्यात आला आहे. डॉ. दिवान यांच्या या दातृत्वामुळे मंदिरातील दैनंदिन पूजा आणि भजनाच्या कार्यक्रमांमधील विजेचा खोळंबा दूर होणार आहे.
​मंदिर परिसरात आयोजित एका छोट्या कार्यक्रमादरम्यान हा इनव्हर्टर सुपूर्द करण्यात आला. गावातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांना नेहमीच मदत करण्याची डॉ. दिवान यांची भावना कौतुकास्पद असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
​याप्रसंगी मुधापुरी येथील भजनी मंडळ, स्थानिक ग्रामस्थ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. शिवाजी दिवान यांच्या या सामाजिक आणि धार्मिक कार्याबद्दल मुधापुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी