पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

 विद्यार्थ्यांच्या फी व शिष्यवृत्तीच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल गुन्हा दाखल केल्याचा आरोप; पत्रकारांवरील दडपशाही थांबवण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे 
बीड : (दि. २७)एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी सीओईपी (COEP) येथील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्याप्रकरणी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज दि.२७ गुरुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी “पत्रकारांवरील दडपशाहीचा धिक्कार असो ” लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला सहन करणार नाही" " हुकुमशाही चालणार नाही " अशा घोषणा देत पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, पोलिस महासंचालक तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

डॉ. गणेश ढवळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमादरम्यान सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील फी आणि शिष्यवृत्तीशी संबंधित गंभीर समस्या पत्रकार मंदार गोंजारी यांच्या माध्यमातून मांडल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांचा आवाज प्रसारमाध्यमांतून समोर आणल्यामुळेच पत्रकारावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रसिद्धी देणे आणि त्यांची बाजू समाजासमोर मांडणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार व कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे पत्रकार गोंजारी यांच्यावरील कारवाईचा सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी तसेच विविध पक्ष-संघटनांच्या प्रतिनिधींनी निषेध केला असून, संबंधित गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंच), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), सादेक सय्यद (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), हनुमान घोडके, भीमराव कुट , प्राचार्य डी. जी. तांदळे (मार्गदर्शक, मराठवाडा शिक्षक संघ), ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, लेक लाडकी अभियानचे बाजीराव ढाकणे , आण्णासाहेब मतकर (जिल्हाध्यक्ष रासप बीड), शेषेराव वीर ( जिल्हाध्यक्ष प्रबुद्ध रिपाई बीड), प्रविण आनेराव ( जिल्हाध्यक्ष मायक्रो ओबीसी महासंघ बीड), जयसिंगराजे वीर ( गायरान हक्क अभियान बीड)
आदी सहभागी झाले होते.

पत्रकारांवरील दडपशाही थांबवून मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी