डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे!महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बीडतर्फे अभिवादन



बीड : - अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते आणि संघटनेचे संस्थापक कर्ते सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा बीडच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. 'फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर', 'विवेकाचा आवाज बुलंद करू या' , अशा घोषणा देत त्यांच्या विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ सविता शेटे, राज्य कार्यवाह, विवेकवाहिनी , प्राचार्य कॉ डी जी तांदळे , जिल्हा उपाध्यक्ष आणि शेखर कुमार , 'सा.वादळ'चे संपादक यांनी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी जागवल्या.
कार्यक्रमास अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीड शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.विजय घेवारे, प्रधान सचिव ॲड करुणा टाकसाळ, जिल्हा महिला सहभाग विभाग सह कार्यवाह शुभांगी कुलकर्णी, अनुसयाताई तांदळे, पोर्णिमा निर्मळ, शाखा कायदा व्यवस्थापन विभाग कार्यवाह ॲड अंबादास आगे, व्यसन प्रबोधन आणि संघर्ष विभागाचे कार्यवाह बाजीराव ढाकणे , ॲड नितीन रांजवण, ॲड बक्षूभाई सय्यद , शिवाजी नागरगोजे, प्रोफेसर विधिज्ञ पंकज तांदळे ,नितीन जायभाये,प्राचार्य राजकुमार कदम,शेख मुसा, किशोर देवा कुलकर्णी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. डॉ. दाभोलकर यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी आणि अनिष्ट प्रथांविरोधात आयुष्यभर केलेल्या संघर्षाची आठवण यावेळी उपस्थितांना करून दिली.
वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि मानवतावादी विचार समाजात रुजविण्यासाठी डॉ. दाभोलकर यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
“माणूस मारता येतो पण विचार मारता येत नाहीत, त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार सर्वांनी केला. डी जी तांदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी