वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; मित्रपरिवाराच्या प्रेमाने अशोक कुताळ भारावले

वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; मित्रपरिवाराच्या प्रेमाने अशोक कुताळ भारावले
सुंबेवाडी, पिंपळा, लोणी, हातोळण औरंगपूर परिसरातील मित्रपरिवाराकडून मनापासून शुभेच्छा; मान्यवरांकडून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद

आष्टी तालुक्यातील पत्रकार अशोक कुताळ यांच्या वाढदिवसानिमित्त सुंबेवाडी, पिंपळा, लोणी, हातोळण, औरंगपूर परिसरातील मित्रपरिवार, हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आशीर्वादही दिले.

यावेळी खासदार निलेश लंके साहेब, खासदार बजरंग सोनवणे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे काका तसेच यश भैया आजबे यांनी अशोक कुताळ यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा देत सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गावागावातील सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशोक कुताळ यांच्यावर वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या प्रेमामुळे शुभेच्छुक व मित्रपरिवाराचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

“आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझ्या पुढील वाटचालीची खरी ताकद आहे,” अशी भावना अशोक कुताळ यांनी व्यक्त केली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी