आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कासाठी तंट्या नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी: प्राचार्य साईनाथ माळे
आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कासाठी तंट्या नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी: प्राचार्य साईनाथ माळे
बीड | प्रतिनिधी : आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कांसाठी आद्य क्रांतिवीर तंट्या नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य साईनाथ माळे यांनी केले.
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य अधिकारी/कर्मचारी संघटना, बीड आणि बालाघाटचा एकलव्य प्रतिष्ठान, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे आदिवासी समाजबांधव, पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात अमरावती येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर महामानवांना मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार आदिवासी नृत्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी PSI आश्रुबा बरडे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून बालाघाटचा एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुश बरडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य अधिकारी/कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिरुद्धजी गायकवाड, ज्येष्ठ उपाध्यक्ष रमेश सोनवणे, दिलीप मोरे, शिवाजी सोनवणे आणि प्रा. पंडित मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमात संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षा तथा तहसीलदार जालना छायाताई पवार यांनी स्पर्धा परीक्षांबाबत, प्राचार्य साईनाथ माळे यांनी आदिवासी समाजासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांबाबत, रुपेश पवार यांनी आद्य क्रांतिवीर तंट्या नाईक यांच्या कार्याबाबत, तर दीपक बरडे यांनी ऊसतोड कामगारांच्या अडचणी व त्यावरील मार्ग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य साईनाथ माळे म्हणाले की, “आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कांसाठी तंट्या नाईक यांच्या संघर्षातून प्रेरणा घेतली पाहिजे. शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि शासकीय योजनांचा प्रभावी उपयोग करून तरुणांनी स्वतःबरोबरच समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.”
नवनियुक्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील नवनियुक्त कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ओमसाई संतोष सोनवणे तलाठी, बीड कु. ऋतुजा संतोष बरडे – ब्रँच पोस्ट मॅनेजरपदी नियुक्ती राम अर्जुन माळी – पोलीस पाटील, शिरापूर (गात), शिरूर का.ज्ञानेश्वर विठ्ठल बरडे – पोलीस पाटील, मानूर, शिरूर का. विश्वजित गणेश नरवडे – पोलीस पाटील, समनापूर, बीड
विष्णु तुळशीराम बरडे – पोलीस पाटील, खंडाळा, बीड
मीना भागवत माळी – पोलीस पाटील, मोरेवाडी, अंबाजोगाई
लक्ष्मी आत्माराम शिंदे – पोलीस पाटील, कोळगाव, गेवराई
विशाल रामराव सोनवणे – ग्रामविकास अधिकारी, धारूर परमेश्वर पवार – आरोग्य सेवक पदोन्नती
महेश भगवान माळी – लॅब असिस्टंट
चि. वेदांत परमेश्वर पवार – बास्केटबॉल राज्यस्तर
कु. अक्षरा महादेव नरवडे – रग्बी राज्यस्तर
चि. महादेव नरवडे – रग्बी राज्यस्तर
कु. श्रुती रुपेश पवार – NMMS शिष्यवृत्तीस पात्र
डॉ. अजितराजे तुकाराम जाधव – मोफत आरोग्य शिबिरातील योगदान
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अनिरुद्धजी गायकवाड यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष बरडे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन राम माळी व राजेंद्र बरडे यांनी पाहिले.
या मार्गदर्शन मेळाव्यास बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, कर्मचारी आणि आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment