लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवतकथा सप्ताहास प्रारंभ
लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवतकथा सप्ताहास प्रारंभ
पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; पंचक्रोशीतील महानुभाव भाविकांची उपस्थिती
लिंबागणेश : (दि.२९) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक महोत्सवानिमित्त आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या (दशम स्कंध) सोहळ्यास आज शनिवार, दि. २९ रोजी उत्साहात प्रारंभ झाला. पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
धार्मिक विधीनुसार श्रीदत्तात्रेय व लक्ष्मीनारायणाची पूजा करण्यात आली. यावेळी चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर दत्तात्रेय महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. धूप, दीप, फुले व नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली.
सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पारायण, दुपारी उटी-उपहार, सायंकाळी आरती व प्रवचन, तर रात्री संगीतमय भागवतकथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड येथील भागवताचार्य प.पू. महंत श्री ओंकार व्यास बाबा शास्त्री महानुभव यांचे प्रवचन या सप्ताहात होणार आहे. दि.५ सप्टेंबर रोजी काल्याच्या किर्तनाने भागवतकथा सप्ताहाची सांगता होणार आहे.
या धार्मिक सोहळ्यास पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेकर, महंत विश्वनाथ बाबा यांच्यासह पंचक्रोशीतील महानुभाव भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी मंदिराचे पुजारी विजय पाटोदेकर, राजेभाऊ आप्पा गिरे, अनंतकाका मुळे, बालासाहेब जाधव, कल्याण बापू वाणी, सुंदरनाना जाधव, बाळुकाका थोरात,बाळकृष्ण मुळे, विक्रांत वाणी, गणपत तागड, भगवान मोरे,गोवर्धन गिरे, रंजित भोसले, रामकिसन गिरे, विनायक वाणी, शंकर वाणी, दादा गायकवाड, संजय घोलप,लहु जाधव,संदीप मुळे, छबु मांगलकर, रामदास मुळे, अर्जुन घोलप, गणेश लिंबेकर, संतोष भोसले, सुदाम रणखांब, जय गिरे, भालचंद्र गिरे , तुळशीराम वनवे, विठ्ठल कदम, दशरथ दाभाडे, अर्जुन गिरे आदींनी उपस्थिती होती.
Comments
Post a Comment