करचुंडी येथील गायरान प्रश्न 13 व्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच
करचुंडी येथील गायरान प्रश्न 13 व्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच जिल्हा कचेरी समोरील चार आंदोलक पडले आजारी बीड प्रतिनिधी - करचुंडी येथील ग्रामस्थ गेल्या तीन पिढ्यापासून गायरान जमीन कसून आपली उपजीविका भागवत आहेत. काही लोकांचे नाव सातबारा ला लागले आहेत. तर काही लोकांचे नाव सातबारा मध्ये अद्याप लागले नाही. या मागणीसाठी 18 ऑगस्ट पासून हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. त्याची अद्याप दखल प्रशासनातील कुठल्याच अधिकाऱ्याने घेतलेली नाही . या धरणे आंदोलनकर्त्यांमध्ये चार लोक आजारी पडले आहेत. गावात पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था नाही, धड काँक्रीटचे व्यवस्थित रस्ते नाही, दलितांसाठी स्मशानभूमी नाही, नळ योजना आल्या पण फक्त कागदावरच खूप मोठा भ्रष्टाचार गावामध्ये झाला आहे. घरकुल योजना देखील काही ठराविक लोकांना दिली गेली त्यात मागासवर्गीय लोकांना डावलले गेले आहे. राहिलेल्या लोकांच्या नावे सातबारावर नावे लावावी अशा मागणीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही अशी भूमिका आंदोलनाचे नेतृत्व...