गुत्तेदारीसाठी राजकारण करणाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल करू नये-नगरसेवक ॲड विकास जोगदंड
बीड (प्रतिनिधी) 18 ऑगस्ट महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान (राज्यस्तर) अंतर्गत बीड नगरपरिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे कडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर यांनी निधी मागणी करत पाठपुरावा केल्याने जिल्हा सह आयुक्त नगर परिषद प्रशासन विभाग
यांनी दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी
प्रधान सचिव
नगर विकास विभाग नवी-2 यांना तसेच
आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय
बेलापूर भवन, मुंबई यांचेकडे प्रशासकीय स्तरावरून मान्यता मिळावी याकरिता 1,37,81,37,942 रु चा प्रस्ताव पाठविला असून सदरील प्रस्तावास लवकरच मान्यता मिळेल आणि शहरातील प्रमुख रस्त्याचा प्रश्न मार्गी लागून बीड शहरातील विकासात्मक सौंदर्यात आणखी भर पडेल
परंतु अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले निव्वळ स्वार्थासाठी राजकारणात आलेले भ्रष्ट अधिकाऱ्याची पाठराखण करून मलिदा लाटणारे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वार्थ साधणारे काही
पक्षाचे जिल्हा पदाधिकारी यांनी बीड शहरातील सुजाण नागरिकांची दिशाभूल करू नये असे आव्हान भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे
तसेच घोडा मैदान जवळ असून
आगामी नगरपरिषद निवडणुकीत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष
डॉ योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी सर्व सामान्य नागरिक उभा असून विकासात्मक नेतृत्वालाच प्राधान्य देईल असा विश्वास ही शेवटी माजी नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे
Comments
Post a Comment