बीड नगरपरिषद प्रभाग रचना प्रकरणी आक्षेप दाखल - अनिल उर्फ (बंडू) निसर्गन
बीड प्रतिनिधी - नगरपरिषद बीड येथे जुनीच प्रभाग रचना जाहीर केली आहे. व या प्रभाग रचनेविषयी पक्ष अर्ज दाखल करण्याची मुदत 31ऑगस्ट 2025 अशी आहे. अनेक प्रभागातील वस्त्यांची व नगरांची फोड करून अनेक मतदारावर अन्याय केला आहे. याचा आक्षेप प्रभाग चार मधील अनिल उर्फ (बंडू) निसर्गन व अँड. राहुल साळवे यांनी आक्षेप नोंदवला आहे. प्रभाग चार विषयी आक्षेप अर्ज दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी विधीज्ञ जुनी प्रभाग रचना बदलून नवीन प्रभाग रचना तयार करावी म्हणून आक्षेप मुख्याधिकारी नगरपरिषद तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन जुनी प्रभाग रचना निर्माण करताना केली नाही. काही लोकांचा राजकीय फायदा व्हावा या दृष्टिकोनातून मुख्य वस्त्यांचे विभाजन करून दुसऱ्या प्रभागात नावे जोडण्यात आली आहे. त्यामुळे जुनी प्रभाग रद्द करून नवीन प्रभाग रचना अमलात आणावी यासाठी आक्षेप घेतला आहे. प्रमुख व मुख्य वस्ती आहे तसेच ठेवून प्रभाग रचना करण्यात यावी अशी मागणी अनिल उर्फ (बंडू) निसर्गन व अँड.राहुल साळवे यांनी लेखी निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे केली आहे.
Comments
Post a Comment