राजकीय हक्कासाठी रिपाइंचा संकल्प मेळावा -दीपक कांबळे
केज प्रतिनिधी :- उपेक्षित घटकांच्या राजकीय हक्कासाठी रिपाइं (ए) च्याच वतीने केज येथे संकल्प मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी केले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे, मराठवाड्याचे नेते मजहर खान आणि जिल्हा सचिव राजू जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ ऑगस्ट रोजी केज येथे मुक्ताताई लॉन्स येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) चा संकल्प मेळावा आयोजित आहे. त्या निमीत दि. १७ ऑगस्ट रोजी तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी माहिती देण्यासाठी केज येथील शासकीय विश्राम गृहावर पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, उपाध्यक्ष रमेश निशिगंध, उपाध्यक्ष विकास आरकडे, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, आयटी सेलचे सुरज काळे, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, युवा रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास मस्के, युवा रिपाइंचे निलेश ढोबळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे, ज्येष्ठ नेते ईश्वर सोनवणे, ज्येष्ठ नेते कपिल कागदे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत हजारे, जेष्ठ नेते अंबादास तुपारे, येवता सर्कल प्रमुख हरीश गायकवाड, युवक सरचिटणीस हरेंद्र तुपारे, युवक उपाध्यक्ष विनोद गायकवाड, युबा संघटक विनोद शिंदे, रोहित कांबळे, अविनाश गायकवाड, उत्कर्ष काळे, संगम कांबळे, समाधान जाधव, अक्षय जाधव, दत्ता जाधव, अनंत काळे, सुमित काळे, बाळासाहेब जानराव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने केज शहरात होणाऱ्या "संकल्प मेळाव्या " निमित्त शासकीय विश्राम गृह केज आयोजित नियोजन बैठकीस मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यावेळी मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा सल्लागार उत्तमअप्पा मस्के, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे, जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, युवा जिल्हाकार्य अध्यक्ष विकास मस्के, जैष्ठ नेते कपिलजी कागदे, जेष्ठ नेते दिलिप बनसोडे, जेष्ठ नेते ईश्वर भाऊ सोनवणे, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, आयटी सेल तालुका अध्यक्ष सुरज काळे,
तालुका उपाध्यक्ष रमेश निशिगंध, तालुका उपाध्यक्ष प्रशांत हजारे, जेष्ठ नेते अंबादास तुपारे, येवता सर्कल प्रमुख हरीश गायकवाड, युवक सरचिटणीस हरेंद्र तुपारे, युवक उपाध्यक्ष विनोद गायकवाड, युबा संघटक विनोद शिंदे, रोहित कांबळे, अविनाश गायकवाड, उत्कर्ष काळे, संगम कांबळे, समाधान जाधव, अक्षय जाधव, दत्ता जाधव, अनंत काळे, सुमित काळे, बाळासाहेब जानराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संवाद साधताना दीपक कांबळे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळून देशाला ८९ वर्ष झाली तरी उपेक्षित आणि वंचित घटकांना खऱ्या अर्थाने राजकीय न्याय मिळत नाही. आरक्षण हे केवळ नावालाव असून आरक्षणाच्या आडून त्याचा गैरवापर होत आहे. त्यासाठी संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला आहे. आता आम्ही उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी संघर्ष करणार असून देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्याचे त्यांनी संकेत दिले. शेवटी त्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या न्याय व संवैधानिक मागण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment