परळी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्य अभियंता सुनील इंगळे यांचे रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने स्वागत

परळी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्य अभियंता सुनील इंगळे यांचे रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने स्वागत
परळी ( प्रतिनिधी ) परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांचे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती प्रनित, रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने त्यांच्या दालनात नुकतेच स्वागत करण्यात आले.
      यावेळी संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर, मराठवाडा अध्यक्ष भाई सुनील कांबळे यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी स्वागत करुन आपण मुख्य मालक म्हणून औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन व अनुषंगिक लाभ आणि प्रचलित विविध कामगार कायद्याच्या अंतर्गत न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच सदरिल विविध कामगार कायद्याच्या चौकटीत राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना लाभ मिळतो. फक्त परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळत नाही. त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा उभारण्याचा प्रयत्न केला तर त्या कामगारांना अयोग्य व बेकायदेशीररित्या कामावरून कमी केल्या जाते. तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. त्यावर त्यांनी लवकरात लवकर आपल्या शिष्टमंडळाला पाचारण करण्यात येईल. मी येथील वीज कंत्राटी कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सहकार्य करील असे आश्वासन दिले, अशी माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई सुनील कांबळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी