भारतीय लघु व मध्यम वृत्तपत्र संघटना – 26 ऑगस्ट रोजी महत्वपूर्ण बैठक

बीड प्रतिनिधी- पत्रकारांच्या विविध मागण्या, अडचणी, आणि धोरणात्मक पावले उचलण्यासाठी, तसेच संघटनात्मक बांधणी आणि पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार व हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे 26 ऑगस्ट रोजी दुपारी एक वा. महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.भारतीय लघु व मध्यम वृत्तपत्र संघटना प्रदीप कुलकर्णी प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय लघु व मध्यम वृत्तपत्र संघटना मराठवाडा विभागीय अध्यक्ष आत्मलिंग शेटे जिल्हाध्यक्ष दिगंबर सोळंके, जिल्हा सरचिटणीस बालाजी जगतकर व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ह्या बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारणी विस्तार आणि विविध पदांवर नियुक्ती दिली जाणार असून, पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकार, युट्यूब पत्रकार, संपादक, आणि वृत्तपत्र क्षेत्राशी निगडित पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बैठक पत्रकारांच्या एकजुटीसाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी