बीड जिल्ह्यात महिलांच्या विशेष ग्रामसभा ऑगस्ट मध्ये आयोजित करा एकल महिला संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महिला संघटनाचे निवेदन
बीड प्रतिनिधि :-बीड जिल्ह्यात एकल महिला संघटना ही तळागाळातील पाच हजार महिलांच्या सोबत काम सुरू असून काम करत असताना महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, महिला संपत्ती अधिकार मुद्यांवर काम करत असताना एकल विधवा, परितक्तता, घटस्फोट झालेल्या,निराधार, वृद्ध महिला, अपंग महिलांचे असंख्य समस्या आहेत आणि त्यांचे मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी महिलांना ग्रामपंचायत च्या योजनांचा लाभ घेता यावा, महिलांचा सक्रिय सहभाग असावा, पूर्वी महिला ग्रामसभा घेणे बंधनकारक केले आहे जेणेकरून महिला स्वतः पुढे येऊन प्रश्न मांढतील फक्त महिलांचा गावाच्या विकास कार्यक्रमात मर्यादित सहभाग राहू नये तर त्यांनी निर्णय प्रक्रियेत पुढे असावे त्यांची क्षमता वाढावी या हेतूने कर्तव्याची खऱ्या अर्थाने जाणीव होनार आहे या साठी महिला सभा अतिशय खूप महत्वाचे आहे
ऑगस्ट मध्ये सर्वसाधारण ग्रामसभेत महिलांचे मूलभूत प्रश्न, शासकीय योजना, रोजगार हमी योजनांचे नियोजनबाबत चर्चा होऊन आराखड्यास मंजुरी संबंधित सभेत ठराव ठेवणाऱ्या विषयावर चर्चा होण्यासबंधी महिला सभा घेण्यात यावी व तसेचे तसेच मुद्दे ग्रामसभेत पारित करून सर्वसाधारण ग्रामसभेत ठरावात नमूद करावे यासाठी एकल महिला संघटना बीड जिल्हा वतीने संबंधित यंत्रणेला तसे पत्र काढावेत यासाठीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी एकल महिला संघटनाच्या संजीवनी पखाले, ललिता सावंत, तेजस्विनी उबाळे, शिल्पा पंडित, तारा घोडके, प्रजावती जोगदंड, उर्मिला गालफडे, मंगल कानडे, कौशल्या कळसुले, रुक्मिणी नागापुरे यांच्या निवेदनावर सह्या आहेत
Comments
Post a Comment