पत्रकारांच्या आधी स्वीकृतीसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करणार - आत्मलिंग शेटे

पत्रकारांच्या आधी स्वीकृतीसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करणार - आत्मलिंग शेटे

बीड जिल्हा कार्यकारिणीच्या विस्ताराची बैठक
बीड प्रतिनिधी - भारतीय लघु व मध्यम पत्रकार संघटनेची बैठक 26 ऑगस्ट 2025 रोजी बीड जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत मराठवाड्याचे अध्यक्ष आत्मलिंग शेटे यांनी अनेक नवे पदाधिकारी नियुक्त केले. दैनिक महाभारतचे जिल्हा प्रतिनिधी नितीन जोगदंड यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. याशिवाय दैनिक लोकनेताचे जिल्हा प्रतिनिधी विजय रोडे, बीड स्वरधाराचे संपादक कृष्णा शिंदे, आणि दैनिक महाराष्ट्र प्रतिमाचे इरफान सय्यद यांना संघटक म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. न्यूज 23 मराठीचे गणेश शिंदे यांना जिल्हा सदस्यपदी निवडण्यात आले, तसेच दैनिक परळी नगरीचे दत्ता शिवगण आणि दैनिक जनसामान्यांचा विकासनामाचे संपादक बाळासाहेब फपाळ यांचीही निवड करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी प्रवीण वडमारे यांची नियुक्ती झाली.

बैठकीत बीड जिल्हा संघटनेचे सचिव बालाजी जगतकर यांनी संघटनेच्या महत्त्वावर चर्चा केली आणि बीडच्या पत्रकारांच्या मुख्य मागण्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन शासन स्तरावर दिले. आत्मलिंग शेटे यांनी पत्रकारांच्या आव्हानांवर विचार केला आणि आवश्यक त्या स्वीकृतीसाठी वरिष्ठ स्तरावर सहकार्याची हमी दिली.

बैठकीच्या प्रारंभात उपस्थित पत्रकारांना पुष्पहार देऊन सत्कारण्यात आले. या बैठकीत संघटनेच्या विस्तारावर चर्चा करण्यात आली, तसेच पत्रकारांचे जाळे निर्माण करण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला, ज्यामुळे पत्रकार संघटनेची ताकद वाढवण्याची योजना आहे. समारोप ही बैठक बीड जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, संघटनेतील एकजुटीचा आणि सहकाराचा संदेश सर्वत्र पोहोचवला गेला.

 
आपले विचार व्यक्त करीत असताना आत्मलिंग शेटे यांनी सांगितले की स्वीकृती धारक पत्रकारांना अनेक बसेस मध्ये डावलले जाते शिवनेरी तसेच ई,-बस यामध्ये त्यांना प्रवास करता येत नाही तरी त्याबाबत लवकरच परिवहन मंत्री सरनाईक यांना सर्व पत्रकाराच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटणार असल्याचे आत्मलिंग शेटे यांनी सांगितले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी