जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त व्हाव्यात यासाठी आम आदमी पार्टी झोप काढू आंदोलन करणार
जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त व्हाव्यात यासाठी आम आदमी पार्टी झोप काढू आंदोलन करणार
माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा ची आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या शिष्टमंडळानेआपल्या कार्यक्षेत्रातील डबघाईस आलेल्या सरकारी/जि.प./न.पा./मनपा शाळांना त्वरित मुलभूत सुविधा उपलब्ध करून देवुन सरकारी शाळा वाचाव्यात १ आगष्ठ२०२५ पासुन ते ८आगष्ठ २०२५पर्यत आपल्या कार्यक्षेत्रातील काही शाळेची प्रत्यक्षात पाहणी केली महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टी च्या वतीने संपूर्ण राज्यात दिनांक १आगष्ठ २०२५ पासुन ते ८आगष्ठ २०२५ या कालावधीत *मुलांच्या हक्कासाठी आम आदमी पार्टी निघाली सरकारी शाळेच्या भेटीला* या अभियान अंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील काही शाळांना *आम आदमी पार्टी च्या शिष्टमंडळाने* भेटी दिल्या आहेत. यावेळी आमच्या निदर्शनास आले की काही शाळांना मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत व अनेक शाळांच्या इमारती ह्या डबघाईस आलेल्या आहेत तर काही शाळांमध्ये मुलांना व मुलींसाठी मुलभूत सुविधा नसलेले शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय नाही शाळेंना स्वतःची बिल्डिंग नसून किराईच्या बिल्डिंगमध्ये भरत आहेत त्या बिल्डिंगचा किराया देखील वेळेवर दिला जात नाही काही त्या शाळा झाडाखाली मोकळ्या मैदानात लिंबाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली पडक्या शाळेत जीव मुठीत घेऊन शिक्षक शिकवत आहेत विद्यार्थी शिकत आहेत तसेच काही शाळांमध्ये वर्ग पाच तर शिक्षक एकच त्याच शिक्षकाने शिकवायचे खिचडी वाटप करायची साफसफाई करायची अशा शाळेमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचे मोलमजुरांची लेकरं कसे शिकत असतील हे विदारक सत्य समोर आले आहे.
हे विदारक भयानक सत्य आपणास माहीत असतानाही आपण व आपल्या सरकारने सरकारी शाळांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत.या अशा अनेक कारणांमुळे सरकारी शाळांची स्थिती डबघाईस आली आहे.
तरी आम आदमी पार्टी ची मागणी मान्य करून आपल्या कार्यक्षेत्राची स्तोत्रं असलेल्या शाळा वाचवाव्यात यासाठी सरकार कसलेही प्रयत्न करताना दिसत नाही सरकार झोपा काढतय की काय का जाणून-बुजून झोपेचं सोंग करतय त्याला शाळांची आठवण करून देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.00 ते 02.00 वाजेपर्यंत झोप काढू आंदोलन करून सरकारला या विषयी आठवण करून झोपेतून जागे करण्यासाठी जास्तीत जास्त सामान्य नागरिकांनी या आंदोलनास उपस्थित राहावे असे देण्यासाठी आंदोलन करत आहोत याचीअसे निवेदन मुख्यमंत्री पालकमंत्री शिक्षण मंत्री यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत देण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, सहदेव खंडागळे जिल्हा उपाध्यक्ष, कैलास चंद पालीवाल जिल्हा कोषाध्यक्ष, माऊली भाऊ शिंदे जिल्हा सचिव, सय्यद सादेक शहराध्यक्ष, मिलिंद पाळणे शहर सचिव, रफिक पठाण अल्पसंख्याक विभाग प्रमुख बीड जिल्हा, कृष्णा जगताप तालुका अध्यक्ष, आजम खान तालुका अध्यक्ष इत्यादि कार्य करते उपस्थित होते
Comments
Post a Comment