अजित दादांचं काम बीड च्या नागरिकांसाठी बीडच्या विकासासाठी निधी ना. अजित दादांनी दिला उठ सूठ कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये-शेख निजाम

 

बीड (प्रतिनिधी) बीड वासियांसाठी अत्यंत चांगली बाब घडलेली आहे मा.ना. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले व त्या अनुषंगाने आपल्या कार्याची छाप सोडण्यास सुरुवात केली. मा. अजित दादा यांनी प्रत्येक घटकापर्यंत सर्वांगीण विकास कसा पोहोचेल यासंबंधीचा वाटचाल सुरू केलेली असून बीड जिल्ह्यातील व बीड शहरातील प्रत्येक अविकसित घटकाचा भागाचा राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असल्याचे जनतेस दिसत आहेत त्याचाच एक भाग म्हणून बीड शहरातील रस्ते नाल्या व इतर पायाभूत सुविधा करिता ना. अजित पवार साहेब यांनी
विमानतळ, रेल्वे चे जलद गतीने काम,
 100 कोटी रु निधी नगरउत्हान
 योजना , 25 कोटींहून अधिक स्टेडियम साठी, टाटा समूह व शासनाकडून एनोवेशन सेन्टर 200 कोटीं
,खासबाग ग्राउंड, शहरतील तीन ठीकाणी नाना नानी पार्क व गार्डन नगरपरिषद अंतर्गत विविध विकास योजनेतून भरपूर निधी चे प्रस्ताव असे अनेक लोकविकास कामांचा धडाका दादांनी सुरु केला आहे अजित दादा यांनी दिलेल्या निधीबद्दल अचानक पणे, भलत्यांनाच श्रेयवाद घेण्याच्या उकळ्या फुटत आहे मागील 35 ते 40 वर्षापासून एक हाती स्वतःच्या घरात सत्ता असताना सुद्धा त्यांना बीड शहराचा विकास करता आला नाही व ज्यांनी बीड जिल्हा बीड मतदार संघ व बीड शहर चूरून खाल्ले तेच आता शहराच्या विकासा च्या गप्पा मारताना दिसत आहे यापूर्वी झालेल्या भुयारी गटार योजना,अमृत अटल योजना ,वाढीव अमृत अटल योजना, नगरोत्थान योजना ,यु आय डी एस एस एम टी पाणीपुरवठा, योजना दलित वस्ती नागरी सुधार योजना ,यासारख्या अनेक योजना व बीड शहरातील महत्त्वा च्या रस्ते व नाल्यांचे किती टेंडर व किती रक्कम कोणी कित्येक वेळेस बिले काढून खाल्ली हे सर्व बीडच्या जनतेस माहित आहे बीड च्या प्रस्तावित कुटुंबातील भावंडे एकमेकांवर आरोप करून लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करीत आहे चार दशक सत्ता एक हाती आहे परंतु विकास तर दिसत नाही शहर भकास असल्याचे दिसत असून यांनी अनेक काम चालू व बंद करण्यासाठी ची टक्केवारी कोणी घेतली याची सुद्धा जाणीव बीड शहरातील जनतेला आहे कामाचा माणूस अजित दादा यांनी दिलेल्या बीडच्या विकासासाठी चा निधी स्वतः आणला आम्ही केले असे वर्तमानपत्र व समाज माध्यमांमधून प्रसारित करून आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचे काम प्रस्थापित कुटुंबातील भावंडे करीत असल्याचे दिसत आहे अचानकपणे भलत्याच लोकांना बीडचा विकास करण्याची उकळ्या फुटत असल्याचे सर्वसामान्य जनतेला दिसत असून जनता पालकमंत्री ना.अजित दादा पवार ,मा.मंत्रीआ. धनंजय मुंढे ,मा.आ अमरसिंह पंडीत,विजयसिंह पंडित यांच्या सुचविले कामांनी प्रभावित झालेले असून एवढ्या वर्ष सत्ता असून शहरासाठी काहीही न करणाऱ्या प्रस्थापित भावंडांनी फुकटचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे शेख निजाम यांनी म्हटले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी