निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे परळीतील प्रभाग रचना करा - बालाजी जगतकर
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे परळीतील प्रभाग रचना करा - बालाजी जगतकर
शहरातील अनेक वस्त्यांचे विभाजन करून जुनी प्रभाग रचना
नवीन प्रभाग रचना करण्यासाठी नगर परिषदेतकडे आक्षेप, हरकती नोंदवा...
बीड / परळी प्रतिनिधी - परळी शहरातील सर्वच मागासवर्गीय वस्त्यांची विभाजन करून जुनी प्रभावी रचना केली आहे. ती बदलून नवीन प्रभाग रचना करा त्यामध्ये प्रामुख्याने भिमनगर, जगतकर गल्ली, प्रबुद्ध नगर, रोडे गल्ली ताटे गल्ली आरोग्य गल्ली, रमानगर, या वस्ती आहे अनुसूचित जातीच्या आहेत. त्या भागाचे विभाजन टाळून अनुसूचित जातीच्या प्रभागात समावेश करावा यासाठी जवळपास 100 पेक्षा जास्त मतदारांनी व या भागात राहणाऱ्या लोकांनी हरकती, आक्षेप नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे नोंद करायला सुरुवात केली आहे. व आक्षेपी व हरकती नोंद सुरूच आहेत 31 ऑगस्ट पर्यंत त्या नोंदवल्या जाणार आहेत.
या अगोदर देखील दि. 19/6/2025 या तारखेला निवेदन दिलेली आहे. अनुसूचित जाती या समाजाचा असल्यामुळे दलित वस्ती व इतर योजनेपासून वंचित ठेवत आहात प्रभाग क्रमांक पाच (5) गणेशपार, कालरात्री देवी मंदिर परिसर, यात आपण जगतकर गल्ली, गणेश पारपरिसर, काळाराम मंदिर परिसर, व आंबेवेस या प्रभागात अनुसूचितजाती लोकसंख्या 657, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 06, व प्रभाग क्रमांक 16 या प्रभागात आपण अनुसूचित जाती लोकसंख्या 577, अनुसूचित जमाती 76 लोखसंख्या आहे. या दोन प्रभागाची अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या एकत्र केल्यास 1200 आहे तेव्हा या निवेदनावर माझा असा आरोप आहे की आपण प्रभाग क्रमांक 5. प्रभाग क्रमांक 6 या दोन्ही प्रभागाचे मते विभागून आपण कोणा तरी राजकीय पक्षाला मदत करत आहात. आपणास पुनश्च विनंती आहे की निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे म्हणजे वार्डाची लोकसंख्या ही अध्यांपेक्षा जास्त अनुसूचित जातीची असावी, व 5.5.3 प्रभाग रचना मार्गदर्शन तत्त्व 5.5.3 व अनुसूचित जाती ऑब्लिक अनुसूचित जमाती यांच्या वस्तीचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी मुंबई यांनी दिलेले असतानाही परळी नगरपालिका प्रशासन, परळी निवडणूक अधिकारी व प्रस्थापित राजकीय नेते आमदार, खासदार यांच्या सांगण्यावरून त्यांचे त्यांच्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना करत आहेत व केली आहे. यामुळे राजकीय अन्याय तर होतच आहे पण आमच्या अधिकाऱ्यापासून आम्हास वंचित ठेवत आहात. नगरपालिका प्रशासन व प्रस्थापित राजकीय नेते यांनी संगणमत करून जाणीवपूर्वक अशी प्रभाग रचना केली आहे. अनुसूचित जातीच्या वाडांचे विभाजन प्रभाग क्रमांक 04 प्रभाग क्रमांक 05 प्रभाग क्रमांक 16 यातील प्रभाग रचनेत केलेले आहे. तेव्हा सदरील प्रभाग रचना पुन्हा करून अनुसूचित जाती व जमातीचा प्रभाग एक करावा अन्यथा आपल्या विरोधात आम्हाला कायदेशीर व सनदशीर मागने न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. न्याय न मिळाल्यास कायदेशीर लढाई देखील लढली जाणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या दोन महिने अगोदर संबंधिताला निर्णय प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात 200 लोकांच्या तक्रार व निवेदन देऊनही कुठलीच कारवाई न केल्याच्या बद्दल संबंधिता विभागाच्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येऊ का नये अशा प्रकारे नोटीस ही बजावणार आहेत अशी माहिती किंवा चर्चा येथील मतदारातून होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment