ऑल इंडिया पॅंथर सेना निवडणुकीसाठी सज्ज सातारा- बैठकीत रणनीती ठरली - राज्य प्रदेश प्रवक्ते- नितीन सोनवणे


बीड: ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या महाराष्ट्र कोर कमिटीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली. सातार्यातील विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत निवडणूक तयारीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पुण्यात लवकरच राज्यव्यापी कार्यकर्त्यांची भव्य बैठक घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

ऑल इंडिया पॅंथर सेना आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून, सामाजिक आंदोलनातून उदयास आलेली ही संघटना राजकीय क्षेत्रात ठामपणे वाटचाल करत आहे. सर्वसामान्य, शोषित आणि वंचित घटकांचा आवाज म्हणून पॅंथर सेनेने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या पुढे येत असून, संघटना त्यांना रचनात्मक आणि संस्थात्मक दिशा देण्यास सज्ज असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस जितेश भाई जगताप, प्रदेश प्रवक्ता व बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले आणि कोऑर्डिनेटर अविनाश हिवाळे उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी