पुण्यातील तरुण मुलींवर पोलिस अत्याचार प्रकरणी जातीयवादी, लैंगिक छळ करणाऱ्या पोलिसांवर त्वरित कार्यवाही ची साठी एकल महिला संघटना ची मागणी
बीड प्रतिनिधी :-पुण्यातील तीन मुलींवर त्याचा कोणताही गुन्हा नसताना पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण केली मोबाइल व घराची झडती घेतली, त्यांना दिवसभर डांबून ठेवले व शारीरिक मानसिक छळ केला निवृत्त पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या छ संभाजीनगर मधील पिढीतेच्या सासर्याने या मुलींच्या घरी व कामाच्या ठिकाणी पोलीस पाठवून त्या मुलींना धमकावले व बेकायदेशीर पणे पुणे पोलिस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली तसेच जातीवाचक शिव्या दिल्या अशा प्रकारच्या अमानुष वागणूक तीही पोलिसांकडून मिळणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, असे पदाचा गैरप्रकार व हितसंबंधीयाकडुन पोलीस कर्मचाऱ्यांवर दबाव त्यांना असणारे राजकीय अभय !!
यासाठी
1) या संपूर्ण प्रकरणात पॉलिसी कार्यवाही च्या नाहक बळी ठरलेल्या व्यक्तींचा सन्मान पूनरस्थापित झाला पाहिजे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी तात्काळ कार्यवाही करावी
2) जातीवाचक शिविगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.
3) सासरच्या छळमुळे आश्रयासाठी बाहेर आलेल्या कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलेस संरक्षण व सुरक्षितता ची हमी द्यावी.
4) आपल्या पूर्वीच्या पदाचा गैरवापर करत पोलिस यंत्रणेचा वापर करणाऱ्या सदर महिलेच्या सासर्यावर कठोर कारवाई व्हावी.
5) तरुणींच्या नोकरी व राहते घरी आर्थिक व सामाजिक दुजाभाव या पासून संरक्षण चा अधिकार शासनाने अबाधित राहील याची काळजी घ्यावी
6) या दंडशाही मुळे भोगाव्या लागणाऱ्या सर्व त्रासासाठी पोलीस प्रशासनाकडून या तरुणींची बिनशर्त माफी मागितली जावी.
झालेल्या घटनेचा एकल महिला संघटना निषेध करत आहे तसेच पिढीत मुलींना त्वरित न्याय देऊन संबंधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटना च्या वतीने करण्यात आली असून निवेदनावर रुक्मिणी शिल्पा पंडित,तेजस्विनी उबाळे, ललिता सावंत, तारा घोडके, उर्मिला गालफडे, प्रजावती जोगदंड, मंगल कानडे, कौशल्या कळसुले, रुक्मिणी नागापुरे संजीवनी पखाले यांच्या सह्या आहेत
Comments
Post a Comment