जयसिंग वीर च्या नेतृत्वाखाली करचुंडीतील गायरान प्रकरणी जिल्हा कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु




 बीड प्रतिनिधी - मौजे करचुंडी गावालगत असणारी गायरान जमिन मिळावी यासाठी धरणे आंदोलन करणेत आले होते.तरी त्या आंदोलन काळादरम्यान आंदोलन कर्त्याच्या मागण्या मान्य न झालेमुळे दिनांक 14/08/2025 ते मागण्या मान्य होईपर्यंत तसेच तीव्र आंदोलन चालू केले आहे.आंदोलन दरम्यान असणाऱ्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये करचुंडी गावा व मंजेरी गाव बीड जिल्ह्यातील अनेक गावांदरम्यान लगत असणाऱ्या गायरान जमिनीचे पीडीत वंचित भूमिहिन शेतकऱ्यांना वाटप करणे पायी मोर्चा अनेक गावांदरम्यान लगत असणाऱ्या गायरान जमिनीचे वंचित भूमिहिन शेतकऱ्यांना वाटप करणे.सातबारा मध्ये शेतकऱ्यांचे नाव नोंद करणे अथवा चढवणे. पीक पंचनामे करणे तसेच पीक विमा शेतकरी पेंन्शन योजना मोफत बी बियाणे, अवजारे, शेततळे, मोफत वीज (सोलार पंप) आदी सवलती सुविधा लाभ देणे. सदर गायरान जमिनीचे पुर्ण अधिकार देणे आदि मागण्या संदर्भात मागण्या मान्य होईपर्यंत बीड जिल्ह्यातील बहुजन शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहे व सदरचे आंदोनास मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. गावाचे नाव करचुंडी मंजेरी गाव बेलखंडी व इतर गेवराई तालुक्यातील व माजलगाव तालुक्यातील सर्व बीड जिल्हा तालुक्यातील खेड्यापाड्यातील दलीत बांधव व विविध संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
मौजे करचुंडी गावातील एकुण गायरान धारकापैकी अर्ध्या गायरान धारकांचा 7/12 मिळाले आहेत उर्वरित गायरान धारकांना 7/12 देणेत यावेत. सन 2011 चा सुप्रीम कोर्ट आदेश मधात न आणता आमचा गायरान धारकांचा सन 1965 चे आज रोजी ताब्या सुरू असलेला लढा विचाराधीन आज व त्वरीत सर्व शासकीय सुख सुविधा चा गायरान धारकांना लाभ देवुन त्यांना 7/12 उतारा देणेत यावा. भारतदेश 1947 ला स्वतंत्र मिळाले तरी बहुजन दलित बांधवानी अनेक स्वतंत्र मिळाले नसुन त्यांचा 1965 चा गायरान जमिनीचा लढा चालु असून सातबारा नावावर करून देण्यात यावे व करचुंडी, गावांमध्ये दलीत बांधवाचे स्मशान भुमीचा गंभीर प्रश्न असुन स्मशान भुमी उपलब्ध करून देण्यात यावी व दलित वस्तीचे रस्ते, कॉक्रेट किंवा ब्लक करून देण्यात यावे व दलित वस्ती पाणी गंभीर प्रश्न असुन पिण्याच्या पाण्याचे नळ योजना तात्काळ देण्यात यावे घरकुल योजना राहिलेलया लोकांना तात्काळ देण्यात यावे या सर्व मागण्यांसाठी खरसुंडी येथील गायरान व इतर बघण्यासाठी समस्त शेकडोच्या संख्येने भूमीन गायरान धारक बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी जिल्हा कचेरी समोर बसले आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी