'बीड बचाव' ने बीड शहरातील पथदिव्यांची परिस्थिती नगरपालिके पुढे केली सादर



'बीड बचाव' ने  बीड शहरातील पथदिव्यांची परिस्थिती नगरपालिके पुढे केली सादर

 बीड शहर बचाव मंच व 'एसडीपीआय' पार्टीने पालिका प्रशासनाला अहवाल दिला.

 पथदिव्यांसाठी पुढील एक वर्षाचे बजेट मिळाले आहे

बीड प्रतिनिधी :- बीड शहर बचाव मंच  व एसडीपीआय पार्टीने बीड शहरातील  सद्यपरिस्थितील पथदिव्यांची दुरावस्था व सर्वच भागांमध्ये पथदिव्यांची असलेली आवश्यकता याबद्दल एक व्यापक अहवाल तयार करून पालिका प्रशासनाला सादर केला आहे. काही दिवसापूर्वी बीड शहरातील पथदिव्यांची दुरावस्था या विषयावर बीड शहर बचाव मंचच्या  शिष्टमंडळाने मा. प्रशासक कविताताई जाधव यांची भेट घेतली होती. प्रशासक ताईंनी नीता अंधारे यांच्या कामकाजावर गंभीर नाराजी व्यक्त केली होती. या भेटीमध्ये बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष नितीन जायभाये यांनी शहरातील पथदिव्यांची दुरावस्था व नागरिकांना सामना करावा लागत असलेल्या समस्या याबद्दल गंभीरतेने अनेक गोष्टी निदर्शनास आणून दिल्या होत्या. तरी दरम्यानच्या काळामध्ये  प्रशासक जाधव ताईंनी बीड शहर बचाव मंचाला मी पुढील वर्षाचे पथदिव्यांचे बजेट मंजूर केले आहे अशी माहिती कळवली होती. तरी तुम्ही शहरातील विविध वार्डातील आवश्यकतेनुसार अहवाल तयार करा अशी सूचना केली होती. बीड पालिकेच्या सिओ निता अंधारे यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या मोठ्या गलथान कारभार नंतर व नुकत्याच झालेल्या त्यांच्या बदलीनंतर  माननीय प्रशासक जाधव ताईंकडून आपल्या बीड नगरपालिकेला पुढील एक वर्षात पथदिवे लावण्यासाठी लागणारे बजेट' देण्यात आलेले आहे. तरी या संदर्भात बीड शहर बचाव मंचाने तसेच एसडीपीआय' पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बीड शहरातील विविध भागांमध्ये पाहणी करून व बऱ्याच भागांमध्ये लोकांच्या भेटी घेऊन शहरांमध्ये पसरलेला अंधार दूर करण्यासाठी व्यापक स्वरूपात सर्वे करून विविध भागातील नागरिकांच्या मागणी प्रमाणे एक अहवाल तयार करून बीड नगरपालिकेला सादर केला आहे. बीड नगरपालिका प्रशासनाने व्यापक स्वरूपामध्ये चर्चा करून हा अहवाल स्वीकृत केला आहे. व त्यानुसार काम होईल व शहरातील अंधार दूर केला जाईल असे आश्वासन दिलेले आहे. तरी शहरातील पथदिवे दुरुस्ती व गरजेनुसार नवीन दिवे लावणे हे सर्व काम आता सुरू करण्यात येत आहे. तरी शहरातील नागरिकांनी आपापल्या भागातील परिस्थिती बीड शहर बचाव मंच तसेच एसडीपीआय पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कळवावी असे बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष नितीन जायभाये यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. यावेळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सम्राट कदम, बीड बचाव' चे नितिनजी जायभाये,  सुधीरभाऊ देशमुख, प्राचार्य डी.जी तांदळे सर, कलीम इनामदार जिल्हा समिती सदस्य,एजाज चौधरी, समीर काझी, आदिल शेख,  मुशर्रफ मोमीन बालेपीर  या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी