काँग्रेस-राजद यात्रेत पंतप्रधानांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य! काँग्रेस-राजदने सर्व मर्यादा ओलांडल्या- गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंतांची टीका

काँग्रेस-राजद यात्रेत पंतप्रधानांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य! काँग्रेस-राजदने सर्व मर्यादा ओलांडल्या- गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंतांची टीका

सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा– मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात


पणजीः बिहार दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघातील बिठौली गावात निवडणूक प्रचार कार्यक्रमाच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री हीराबेन मोदी यांच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचे दाखवण्यात आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या कार्यक्रमात काँग्रेसचे राहुल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव यांचे पोस्टर्स झळकल्याचेही दिसत होते. याप्रकाराबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करताना डॉ. सावंत म्हणाले, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी व्यासपीठावरून वापरल्या जाणाऱ्या लज्जास्पद आणि अपमानास्पद शब्दांचा मी तीव्र निषेध करतो. हे कॉंग्रेस आणि महागठबंधनच्या असभ्य आणि दिवाळखोर विचारसरणीचे प्रतिबिंब आहे, ज्या विचारसरणीला भारतीय लोकशाहीत कोणतेही स्थान नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईचा अपमान म्हणजे या देशातील प्रत्येक महिलेचा अपमान आहे. घडलेल्या घटनेबाबत आता हजारवेळा माफी मागितल्यानंतरही भारतातील जनता कॉंग्रेसचे हे पाप कधीही विसरणार नाही. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींविरुद्ध अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या यात्रेच्या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पूजनीय दिवंगत आईविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषा वापरली गेली. राजकारणात अशी असभ्यता यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती. काँग्रेस-राजद यात्रेने सर्व मर्यादा ओलांडल्या असून हे दोन्ही पक्ष सर्वात खालच्या पातळीवर गेले आहेत. त्यांच्याकडे देण्यासारखे काहीही सकारात्मक नाही. मांडण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने त्यांनी चारित्र्यहनन आणि असभ्य भाषेचा मार्ग निवडला असल्याचा आरोपही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला. 

गोव्याच्या जनतेच्यावतीने माझा पंतप्रधानांना पाठिंबाः-

डॉ. सावंत म्हणाले, “गोव्याच्या जनतेच्या आणि संपूर्ण देशाच्या वतीने, मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना माझा पाठिंबा व्यक्त करतो. या लज्जास्पद घटनेने पुन्हा एकदा देशाला दाखवून दिले आहे की इंडिया आघाडीची विचारसरणी काय आहे. भारतातील जनता अशा नकारात्मक राजकारणाला ठामपणे नकार देतील.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी