नियतीचा खेळ आणि गरिबीची जोड
जीवन जगणे आणि वेळ काढणे तश्या खूप भिन्न गोष्टी. जेव्हा पाऊस पडतो तर एक आनंद सगळीकडे असतो. कोणी पावसात गरम भजी खाण्याचे विचार करतो तर कोणी कडक गरम चहा पिण्याचा. पण तो दिवस जरा वेगळा वाटला कारण त्या रात्री खूप पाऊस चालू होता आणि जिल्ह्याचे मेन ठिकाण जो नेहमी गजबलेला परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक. त्या ठिकाणी एक आजी जवळपास सत्तर वर्षांची आपल जीवन पावसापासून बचावताना दिसली. छत्री धरून कशीबशी शरीर झाकण्याचा प्रयत्न करत होती. किती तफावत होती एकीकडे ज्यांना घर–दार सर्व असत तर दुसरीकडे असे लोक जीवनाची प्रत्येक घटका मोजताना दिसतात किती मन हेलावून टाकणारी परिस्थिती आहे.
एकूणच वरील परिस्थिती बघता त्या वर्दळ असणाऱ्या जागेवरून अनेक नागरिक जात होते पण एकालाही वाटले नाही की, ती एक स्त्री आहे, तिला कोणी हात द्यावा, रात्रीची उशीराची वेळ आहे हा प्रश्न का कोणालाच पडला नसेल लाडकी बहीण केवळ नावालाच आहेत का ही देखील कोणाची बहीण असेलच मग तिच्यासाठी का शासन प्रशासन तरतूद करत नाही. शासनाच्या योजनांमधून साठ वर्षांची अट येते. कोणाला मदत करण्याची इच्छा ही असेल तर ते करू शकत नाही. ही नक्कीच तिची अवहेलना नाही का? वृद्धाश्रम भरपूर आहेत पण ते केवळ नावाला त्याकडे शासन प्रशासन कितपत लक्ष देतात असे अनेक प्रश्न या आजी त्या रात्रीच्या प्रसंगातून सांगून गेल्या.
सरते शेवटी आपला देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करतोय पण दररोज असे गरिबीने खितपत पडलेले लोक आपल्याला दिसतात. तर ही गरिबी यांना सोबतच घेऊन जाईल का? असे अनुत्तरित प्रश्न राहून जातात.
संपर्क: ९७६४२२३५३४
Email:newswindow1@gmail.com
ज्योत्स्ना चव्हाण गायकवाड
(लेखिका ह्या एम जी एम महाविद्यालय छ. संभाजीनगर येथून पत्रकारितेत पदव्युत्तर आहेत.)
Comments
Post a Comment