बीड शहराला दररोज पाणीपुरवठा करा - पुरुषोत्तम उर्फ (गोटू )वीर
बिंदुसरा प्रकल्प व माजलगाव प्रकल्प जिल्ह्यातील सर्व तलाव ओव्हरफुल
बीड प्रतिनिधी - बीड शहरातील पाण्याच्या पुरवठ्या बाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. ज्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नगर परिषदेतर्फे फक्त पंधरा दिवसांनी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या परिस्थितीत शहरात पाण्याची गंभीर अडचण निर्माण झाली आहे. सध्या पावसाचे प्रमाण चांगले असून, बीड शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. मात्र, त्याचा लाभ शहरातील नागरिकांना मिळत नाही. पेठ बीड भागातील फिल्टर प्लांट वरून शहरातील 40% पाणी पुरवठा केला जातो, तर उर्वरित पाणी बिंदुसरा प्रकल्प पाली येथील फिल्टर प्लांट वरून करण्यात येतो. पाली येथील बिंदुसरा प्रकल्प म्हणजेच पाली डॅम व माजलगाव डॅमही पूर्णपणे भरलेले आहे, त्यामुळे बीडकरांना दररोज पाणी पुरवठा केला जावा, अशी मागणी पुरुषोत्तम उर्फ (गोटू) वीर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment