वरिष्ठाच्या त्रासामुळे एसटी कर्मचारी महिलेचा जीव जाता जाता वाचला: महिला कर्मचारी डेपो मध्येच पडली बेशुद्ध
वरिष्ठाच्या त्रासामुळे एसटी कर्मचारी महिलेचा जीव जाता जाता वाचला: महिला कर्मचारी डेपो मध्येच पडली बेशुद्ध
बीड प्रतिनिधी:- बीड मध्यवर्ती बस स्थानक येथे तीन महिन्यांपूर्वी वाहक म्हणून कार्यरत असलेल्या स्वाती कांबळे यांना लिपिकपदावर पदोन्नती मिळाली होती. मात्र, त्यानंतर तीन महिन्यांपासून त्यांना हे चार्ज दिले गेले नाही. या दरम्यान, श्वेता कांबळे यांनी दररोज कार्यालयात जाऊन पदोन्नतीच्या चार्जसाठी मागणी केली, पण वरिष्ठांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.
श्वेता कांबळे यांचा मानसिक त्रास वाढत गेला, ज्यामुळे त्यांचा रक्तदाब (बीपी) देखील लो. त्यांनी दोन महिन्यांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु, 23 ऑगस्ट 2025 रोजी कार्यालयात गेल्यावर डेपो मॅनेजर डोके व संबंधित किरण बनसोडे, सचिन तांबारे,सचिन होले या कर्मचार्यांनी त्यांना अपमानित केले आणि तीन महिण्यापासून लिपिक पदाचे प्रशिक्षण दिले नाही व वारंवारलिपिक या पदावर कामं करण्याची तुमची मानसिकता नाही हा शब्दप्रयोग केला जातो या कारणामुळे तेथील कार्यालयातच श्वेता बेशुद्ध पडल्या.
श्वेता बेशुद्ध पडलेल्या असताना, त्यांना संपूर्ण कार्यालयातील कर्मचाऱयानकडून कोणतीही मदत मिळाली नाही. परंतु, आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्यांना सरकारी दवाखान्यात नेलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे संबंधित डेपो मॅनेजर व कर्मचारी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. श्वेता कांबळे यांच्यावर झालेल्या या मानसिक त्रासाबद्दल प्रशासनाने तपासणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जुलै महिन्याच्या हजरीपटावर सही केलेली डेपो मॅनेजर डोके साहेबांनी सहीला राऊंड केले.
यामुळे, एसटी कर्मचारी वर्गात कार्यरत महिलांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला जात आहे.
Comments
Post a Comment