आदर्श नामकरण सोहळा.. मॉडर्न जगात संस्कृती जपत कीर्तन गाव भोजन देत केला नामकरण सोहळा

बीड प्रतिनिधी :- जसं जसं मॉडर्न युग तयार होतोय तसं तसं संस्कार संस्कृती यात बदल होत चाललाय फॅशन म्हणून संस्कार आणि संस्कृतीकडे पाहिले जातात मात्र यातच आजही काही गावकरी मंडळी आपली संस्कार आणि परंपरा जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात घरातील प्रत्येक सण उत्सव आनंद हा संस्कार स्वरूपी आणि पुढील पिढीला एक नवा संस्कार संस्कृतीची जाणीव व्हावी यासाठी जेष्ठ मंडळी करत राहतात असाच एक आदर्श नामकरण सोहळा केस तालुक्यातील सासुरा येथील पाळवदे कुटुंबांनी सगळ्यांना आदर्श ठरेल असा नामकरण सोहळा केला आहे या सोहळ्यात चक्क त्यांनी एकनाथ मठात हा नामकरण सोहळा साजरा करत असताना पारंपरिक पाळणा म्हणत या ठिकाणी पाळदे कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा नामकरण केलं आहे यात दरम्यान या ठिकाणी सुश्राव्य किर्तन देखील ठेवण्यात आलं त्याचबरोबर गाव भोजन देखील देण्यात आलं हा सोहळा सध्या चर्चेला जातोय सध्या सोशल मीडियावर या नामकरण सोहळ्याची चर्चा आहे यात रामपाळवदे यांच्या मुलाचं गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्णा हे नाव देऊन नामकरण करण्यात आलं तर त्यांचे चुलत बंधू यांच्या मुलीचं वैष्णवी असं नाव ठेवण्यात आलं. यात पाळवदे कुटुंबाचा हा आदर्श दस्तूर खुद्द कीर्तनकार यांनी देखील लोकांना सांगताना संस्कार आणि संस्कृती जपत मॉडर्न युगातही आपलं अस्तित्व जपावं असं सांगत प्रबोधन केला

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी