ग्रामीण भागातील सिमेंट रस्ते जोडण्याच्या मुख्यमंत्री , ग्रामविकासमंत्री यांच्या घोषणा कागदावरच ; लोकवर्गणीतून रस्ते ग्रामीण जनतेची शोकांतिका



बीड:- ( दि.१७ ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत १००० लोकसंख्या असलेल्या गावातील प्रमुख रस्ते सिमेंट क्राकीटचे करण्यात येणार असुन त्यासाठी १८ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा केली. तर ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुसज्ज रस्ते मिळावेत. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागाला जोडणारे १० हजार किलोमीटर पर्यंत व्हाईट टॉपिंगचे सिमेंटचे रस्ते तयार करणार येणार असल्याची घोषणा केली. मात्र ग्रामीण भागातील लोकांना लोकवर्गणीतून रस्ते करण्याचे वेळ आली असून एकंदरीतच शासनाच्या घोषणा व योजना केवळ कागदावरच राबवले जात असून वस्तुस्थिती वेगळी असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी बोलून दाखवली.बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील सरपंच विश्वंभर गिरी यांनी महाजनवाडी ते बोरखडे पंतप्रधान पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेसाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामपंचायत मार्फत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. 
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याची ग्रामपंचायत मार्फत दुरुस्ती :- विश्वंभर गिरी , सरपंच महाजनवाडी 

बोरखेड -महाजनवाडी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याची थातुरमातुर दुरुस्ती केली जाते. प्रशासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. ग्रामस्थांना दुधदुभते, बाजारहाट, शालेय विद्यार्थी, दवाखाना याठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत असल्याने शेवटी ग्रामपंचायत मार्फत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले असल्याचे महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी यांनी सांगितले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विशाल घरत,बबन घरत, संजय घरत, शंकर घरत, ऋषिकेश घरत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
 सरकारच्या योजना कागदावरच; लोकसहभागातून रस्ते करण्याची ग्रामस्थांवर वेळ दुर्दैवी :- डॉ.गणेश ढवळे 

सरकार मातोश्री पाणंद रस्ते योजना असेल अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी गावपातळीवर सिमेंट काँक्रीट रस्ते करण्याची घोषणा असेल या घोषणा केवळ कागदावर राहत असून ग्रामीण भागातील लोकांना पावसाळ्यात शेतमाल ,बि-बियाणे, दुध दुभते, बाजारहाट,शाळकरी मुलं दवाखाने आदींसाठी रस्त्यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध करून न दिल्याने अखेर लोकसहभागातून रस्ते करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी दिली.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी