अंबाजोगाई तालुक्यात महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना गठीत - डी.जी.तांदळे



 बीड प्रतिनिधी - अंबाजोगाई सेवानिवृत्तांचे महाराष्ट्र राज्य पातळीवरील स्थापित,नोंदणीकृत संघटन-"महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत अधिकारी कर्मचारी संघटना, " शाखा जिल्हा बीडच्या अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यात दि.26ऑगस्ट,2025 रोजी अध्यक्ष सुरेश खंदारे,सचिव शंकर बुरांडे व कार्याध्यक्ष रामलींग मुंडे यांच्या नेतृत्वा खाली सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांची तालुका शाखा गठीत केली असल्याची माहिती जिल्हा कार्यकारीणीचे मार्गदर्शक प्राचार्य डी.जी.तांदळे यांनी दिली आहे. यासंबंधाने अधिक तपशील असा की,मा.अरुण बोंगीरवार ,
अरविंद इनामदार व मा.र.ग.कर्णिक यांनी स्थापन केलेले हे संघटन आता चंद्रकांत दळवी,मनोहर पोकळे,मा.
उमाकांत दांगट यांचे राज्य पातळीवर तर बीड जिल्ह्यात जालिंदर भोरे,कांचन गायकवाड ,
गौतम चोपडे यांचे पुढाकाराने कार्यरत आहे.
अंबा नगरीत विविध विभागातून सेवा निवृत्त झालेले अधिकारी,प्राचार्य,डॉक्टर,
प्राध्यापक ,शिक्षक व कर्मचारी यांच्या प्रचंड उपस्थितीत तालुका अध्यक्षपदी सुरेश खंदारे,सचिव शंकर बुरांडे,कार्याध्यक्ष रामलींग मुंडे,उपाध्यक्ष डॉ एस.व्ही. माने व एस.एस. हजारे,सहसचिव ए.एस.तट ,कोषाध्यक्ष एस.पी. आव्हाड,संघटक ए एस सय्यद,प्रसिद्धी प्रमुख पी.एन.पाखरे,आणि मार्गदर्शक व्ही.आर.कराड व डी बी जोगदंड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
बैठकीचे अध्यक्ष स्थान आर.एन.मुंडे यांनी भुषविले.
संघटनेची ध्येयधोरणे,उद्देश,कार्यक्रम,कार्य पद्धती,सदस्य नोंदणी, आरोग्य,
समुपदेशन यासबंधाने सभेला 
जिल्हाध्यक्ष जालिंदर भोरे,सरचिटणीस कांचन गायकवाड,उपाध्यक्ष एन. बी.चौरे,मार्गदर्शक प्राचार्य डी.जी.तांदळे यांनी 
संबोधित केले. प्रास्ताविक व सुत्र संचलन जिल्हा कार्याध्यक्ष गौतम चोपडे यांनी केले. निमंत्रित-उपस्थितांचे आभार शंकर बुरांडे यांनी मानले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी