"द लास्ट बॅटल" एकांकिकेची नाट्यपरिषद करंडक च्या अंतिम फेरीसाठी निवड
बीड प्रतिनिधी - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद करंडक या राज्यस्तरीय एकांकिकेत स्पर्धेतील प्राथमिक फेरीमध्ये, सौ.के.एस.के.महाविद्यालय बीड, नाट्यशास्त्र विभाग तर्फे डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या प्रोत्साहनाने सादर झालेली "द लास्ट बॅटल" ह्या एकांकिकेची ‘मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी’ निवड झालेली आहे. या एकांकिकेला "डॉ. दुष्यंता रामटेके" यांचे मार्गदर्शन लाभले असून; त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी हि एकांकिका सादर केली होती. संदीप पाटील लिखित या एकांकिकेचे दिग्दर्शन बाळू बटुळे, संगीत- पांडुरंग शिनगारे, रंगभूषा आणि वेशभूषा - कविता दिवेकर, संगिता बनकर नेपथ्य- केशव पाटील सौरभ मोरे, प्रकाशयोजना - बाळू बटुळे, डॉ. दुष्यंता यांनी केले असून साधना विटोरे, श्रुती गायकवाड,कनिष्क बनसोडे,भागेश दाभाडे,सुमित सोळुंके,एजाज सय्यद, स्वप्नील आव्हाड, आकाश गुंजाळ, आणि अशोक मगर इ. कलावंतांनी अभिनय केला. एकांकिकेचे उत्कृष्ट आणि दर्जेदार सादरीकरण झाले. प्राथमिक फेरीमध्ये छत्रपती संभाजीनगर,बीड, माजलगाव, शिरसाळा येथील संघ सहभागी झाले होते, त्यामधून सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड नाट्यशास्त्र विभागाची "द लास्ट बॅटल" ह्या एकांकिकेची, बीड केंद्रातून अंतिम फेरीसाठी निवड झाली . या यशाबद्दल मार्गदर्शक डॉ. दुष्यंता रामटेके आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी बाळू बटुळे, पांडुरंग शिनगारे, कविता दिवेकर, संगीता बनकर व सहभागी कलावंतांचे , नाट्य परिषदेच्या अध्यक्ष तथा संस्थेच्या सहसचिव डॉ दीपाताई क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ योगेश क्षीरसागर, संस्थेच्या सदस्य डॉ. सारिकताई क्षीरसागर, प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील , संस्थेचे प्रशासकीय अधिकारी. डॉ.व्ही.टी देशमाने, डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. सिद्धार्थ जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ काकडे, पर्यवेक्षक डॉ. कोळेकर , प्रा. विजयकुमार राख, डॉ. असलम शेख आणि महाविद्यालया तर्फे अभिनंदन करण्यात आले आणि अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment