Posts

Showing posts from September, 2024

गोलंग्री येथील शेतकऱ्याची २ एक्कर गोळा केलेली सोयाबीन जाळली ,लाख रूपयांचे नुकसान

Image
बीड:- ( दि.१ ) बीड तालुक्यातील मौजे गोलंग्री येथील शेतकरी बाजीराव परमेश्वर भोईटे यांची त्यांच्या रानुबाई रोड,पीर शिवारातील २ एक्करमधील काढून गोळा केलेली सोयाबीन रात्री अज्ञात ईसमांनी पेटवुन दिली.त्यामुळे त्यांचे अंदाजे लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. मध्यरात्री शेता शेजारील कुक्कुटपालन करणा-या जाधव बंधुनी भोईटे यांच्या शेतातील जाळ पाहिल्यावर मध्यरात्री साडे बारा वाजता त्यांना फोन केला होता.परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सकाळी ही घटना कळल्यावर बाजीराव व कविता दांपत्य शेतात पोहोचले. २ एक्कर सोयाबीनची जळुन राख झाली होती. तलाठी व पोलीस प्रशासन यांना गावचे सरपंच श्रीकांत कवडे यांनी फोनवरून कल्पना दिली आहे.साडे ९ वाजेपर्यंत महसूलचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी येणाऱ असल्याचे कळते.

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बीड जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक साहेब व परळीचे तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा-ॲड.माधव जाधव

Image
परळी प्रतिनिधी - बीड जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक साहेब हे गेल्या १५ वर्षापेक्षा जास्त काळापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध प्रशासकीय पदावर सेवेमध्ये आहेत. श्री अविनाश पाठक साहेब यांनी बीड जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी ,पुरवठा अधिकारी , निवासी ऊपजिल्हाधीकारी , अप्पर जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळामध्ये सदस्य म्हणून सेवा केली आहे.सध्या प्रमोशनवर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सेवेमध्ये काम करत आहेत.एका प्रशासकीय अधिकाऱ्यास एका जिल्ह्यामध्ये गेल्या १५ वर्षापेक्षा जास्त काळापासून सेवेत असल्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व तसेच परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे ते अतिशय स्नेहाचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे परळीचे तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे यांचे जन्मगाव सारडगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड हे असून त्यांचे सर्व नातेवाईक परळी शहरांमध्ये आहेत व श्री व्यंकटेश मुंडे हे सुद्धा श्री धनंजय मुंडे यांचे जवळचे नातलग आहेत.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्

गेवराई वकील संघाच्या अध्यक्षपदी अमित मुळे तर उपाध्यक्षपदी सोमेश्वर कारके व सचिव पदी प्रदीप मडके यांची निवड

Image
 बीड (सखाराम पोहिकर ) आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी गेवराई वकील संघाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली गेवराई वकील संघाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी पार पडली तसेच सकाळी दहा वाजता निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली 215 पैकी 203 विधीतज्ञ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच अमित मुळे हे चौथ्यांदा या निवडणुकीत विजय झाले तसेच विधीतज्ञ सोमेश्वर कारके हे उपाध्यक्ष पदासाठी विजय झाले तसेच प्रदीप मडके हे सचिव पदावर त्यांनी बाजी मारली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेवराई न्यायालयात दरवर्षी वकील संघाची निवडणूक घेतली जाते या निवडणुकीसाठी जेष्ठविधी तज्ञ एचडी सानप या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होते तसेच आज सकाळी दहा वाजता वकील संघाच्या मतदानाला सुरुवात झाली या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी विधीतज्ञ अमित मुळे यांचा 45 मतांनी विजय झाला तसेच विधी तज्ञ सोमेश्वर कारके व विधी तज्ञ पीपी जरांगे यांच्यात लढत झाली उपाध्यक्ष पदासाठी लढत झाली यामध्ये सोमेश्वर कारके हे सहा मतांनी विजयी झाले आहेत तसेच सचिव पदासाठी विधी तज्ञ प्रदीप मडके व विधी तज्ञ आर्यच राठोड यांच्यात

शेख मंजूर कामखेडा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी

Image
बीड (प्रतिनिधी ) - जिल्ह्यातील जवळा हायस्कूल जवळा येथे कर्तव्यरत असलेले कारकून शेख मंजूर यांची कामखेडा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. शेख मंजूर हे शाळेत कर्तव्य बजावतानाच अनेक सामाजिक कार्यक्रम राबवतात. आजही त्यांनी आपल्या गावाशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची कामखेडा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने त्यांचा ह्रदयी सत्कार करण्यात आला. यावेळी आमीर पटेल सरपंच कामखेडा, बाबुभाई, निजाम सर, शिंदे सर, मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस चे मुख्य संपादक शेख एजाज़ यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रिया डोईफोडे यांच्या प्रयत्नातून अचानक नगर भागातील सिमेंट रस्ता, नाली कामाचा शुभारंभ

Image
प्रिया डोईफोडे यांच्या प्रयत्नातून अचानक नगर भागातील सिमेंट रस्ता, नाली कामाचा शुभारंभ  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड उपजिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ नाईकवाडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न बीड दि. 30 (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या निधीतून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या जिल्हाध्यक्षा प्रियाताई डोईफोडे यांच्या प्रयत्नातून बीड शहरातील प्रभाग क्रमांक 18 येथील कनकालेश्वर मंदिर परिसरातील अचानक नगर भागात सिमेंट रस्ता आणि नाली कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भाऊ नाईकवाडे यांच्या हस्ते दिनांक 30 सप्टेंबर रोजी संपन्न झाले.  या भागात अनेक दिवसांची मागणी आज युवती जिल्हाध्यक्ष प्रिया डोईफोडे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवती उपजिल्हाध्यक्ष नुजत सिद्दीकी,युवती जिल्हा सचिव निता माळी, युवती शहराध्यक्ष मोहिनी ओव्हाळ, सय्यद मोहम्मद, शेख ताहेर भाई, सद्दा खान, शेख नविद, झैद कादरी यांच्यासह स्थानिक भागा

बीड रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या :- वंचित बहुजन आघाडी ची मागणी

Image
  गेवराई (प्रतिनिधी ) नव्यानेच तयार होत असलेल्या बीड रेल्वे स्टेशनला अनेक आंबेडकरी अनुयायी चळवळीतील कार्यकर्ते सामाजिक संघटणांनी एकत्र येत बीड रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे बॅनर लावुन त्या स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वानुमते नाव देण्यात यावे अशी मागणी केली त्याच अनुशंगाने गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतिने तालुकाध्यक्ष अजय कुमार (पप्पु) गायकवाड व बीड जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पोकळे आणि भिमराव (महाराज) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी व केंद्रीय रेल्वे मंत्री यांना निवेदनाद्वारे बीड येथील रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव देण्यात यावे अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने करण्यात आली.  यावेळी सुभाष बांगर, किशोर भोले, प्रदिप शिंदे, नवनाथ त्रिभुवन, राहुल त्रिभुवन, विकास बनसोडे, ज्ञानेश्वर हवाले, किशोर चव्हाण, सचिन वाव्हळ, कृष्णा हातागळे, विजय डोंगरे, नितिन खापरे, माही कापसे, दादासाहेब खापरे, शिवाजी केदार, काळेंसह शेकडो कार्यकर्ते अवर्जून उपस्थित होते.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या धम्मकार्यात चंद्रबोधी पाटील यांनी ढवळाढवळ करू नये

Image
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या धम्मकार्यात चंद्रबोधी पाटील यांनी ढवळाढवळ करू नये   डॉ. भीमराव य आंबेडकर यांचा निर्वाणीचा सल्ला     मुंबई प्रतिनिधी - आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर आणि आद. डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना संस्थेतून बडतर्फ केल्याचे पत्रक काढून अवमान करणाऱ्या स्वयंघोषित अध्यक्ष आयु. चंद्रबोधी पाटील यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या कार्यात ढवळाढवळ करू नये असा निर्वाणीचा सल्ला भा. बौ. महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव य. आंबेडकर यांनी दिला आहे. मनमानी कारभार करून, मी म्हणेन ती पूर्वदिशा अशा थाटात वागणारे आयु. चंद्रबोधी पाटील यांनी नेहमीच वाद निर्माण करण्याचे काम केले आहे. यासंदर्भात त्यांनी म्हणजे आयु. चंद्रबोधी पाटील यांचे दिनांक १८ ऑगस्ट २०२४ चे पत्र क्रमांक १२१/२४, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ११ सप्टेंबर २०२४ रोजी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई सेंट्रल ऑफिसच्या बैठकीनुसार १० मुद्यांना बिंदुवर यांचे उत्तर देण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे आहे. (१) हैदराबाद सभेची ३१ जानेवारी २०२४ ही तारीख च

नंदकिशोर मुंदडा सह तीघांनवर तात्काळ कार्यवाही करा - रोहन गलांडे पाटील

Image
नंदकिशोर मुंदडा सह तीघांनवर तात्काळ कार्यवाही करा - रोहन गलांडे पाटील (अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा येनार आहे) केज/ प्रतिनिधी केज अंबाजोगाई मतदार संघातील मौजे जागोईवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील ग्रामपंचायत कार्यालयात महापुरूष यांच्या प्रतीमेसोबत व खाली राजकीय नेते यांची प्रतीमा लावल्याने आमच्या भावना दुखावल्याने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी दीला आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की अंबाजोगाई तालुक्यातील मौजे जोगाईवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय नियमानुसार जे राष्ट्रीय महापुरूष व स्वातंत्र्य सैनीक यांचे प्रतिमा लावण्याचा नियम आहे. परंतु सदर महापुरूषांच्या चित्रासोबत समाविष्ट नसलेले व नियमबाह्य स्वर्गीय मंत्री विमलताई मुंदडा यांची प्रतिमा श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मधोमध प्रतिमा बसवण्यात आली आहे. तसेच सदर प्रतिमेच्या खाली सर्व प्रतिमेप

बीड शहरातील अस्वच्छता, गटारीचे पाणी रस्त्यावर, रस्त्यावरील खड्डे, मोकाट जनावरे निष्क्रिय नगरपरिषद प्रशासनाच्या निषेधार्थ लक्ष्यवेधी " गोट्या खेळा आंदोलन" :

Image
  बीड:- ( दि.३० ) बीड शहरातील रस्त्यांवर जागोजागी कच-यांचे ढीग, पावसाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यावर, अर्धवट नाल्यांची कामे,शहरात पसरलेली दुर्गंधी त्यामुळे पसरणारे साथीचे रोग, बीड शहरातील मान्सुनपुर्व स्वच्छता कामे कागदोपत्रीच करण्यात आली असुन शहरातील शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर त्यामुळे होणारे अपघात तसेच मोकाट कुत्र्यांचा चावा त्यामुळे नागरीकांचे जीव धोक्यात आदी मुलभूत प्रश्नांसाठी वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुद्धा नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यात कसूर करत कामांकडे दुर्लक्ष करत असुन नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.३० सोमवार रोजी नगरपरिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद बीड यांच्या दालनासमोर " गटारीचे पाणी रस्त्यावर,' रस्त्यावर खड्डे ' नगरपरिषद प्रशासन काय करतंय गोट्या खेळतंय " अशी घोषणाबाजी करत गोट्या खेळुन  लक्ष्यवेधी " गोट्या खेळो

वकफ मिळकती वाचविण्यासाठी सर्व मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे

Image
.. नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी:- ( डॉ. शेरूभाई मोमीन ) पुणे येथे, स्व.जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, येथे संपूर्ण महाराष्ट्रातुन , ऑल इंडिया तहेरिके औकाफ तर्फे वकफ अमेनमेंट बिल संशोधन 2024 च्या माध्यमातून एक दिवसाची कार्य शाळा, व भव्य समाज जन - जागृती समाजजोडो संकल्प अभियान अधिवेशन आयोजित केले होते. यावेळी, तहेरिके औकाफ चे राष्ट्रीयअध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी साहेब.बोलत होते. सदर या कार्यक्रमासाठी नागपूर येथून मा.सिनियर अँड.सरफराज मिर्झा नाशिक येथून, शेख हनीफ बशीर, राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष, जेष्ठ नेते,अँड.अन्सारभाई सैय्यद सर, सादिकभाई मोमीन, पत्रकार फैयाज पठाण, स्वाभिमानी सेना, नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, अतिक गाझी, फारूकभाई बागवान. समाजसेवक शमुभाई सैय्यद, मोबीन मुलतानी, हुसेन अन्सारी, सिद्धीक अन्सारी, मजीद अन्सारी, आदम मोमीन,अल्ताफ पठाण, दाऊदभाई शेख, व.ईतर सर्व सदस्य,हितचिंतक, पदाधिकारी,कार्यकर्ते,नाशिक जिल्हाभरातिल समाजसेवक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते..

चौदाव्या दिवशीही कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधी राजेश कुमार जोगदंड यांचे नगरपरिषद कार्यालय बीड समोर अन्न त्याग आंदोलन सुरूच‌

Image
 बीड ( प्रतिनिधी ) नगरपरिषद बीड आस्थापनेतील अधिनस्त कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे, सफाई कामगारांसह इतर आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना जोपर्यंत मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांनी ३१आक्टोंबर २०२३ रोजी एक परिपत्रक निर्गमित केले होते.‌ त्याची अंमलबजावणी अद्याप न करता कंत्राटी कामगारांचे शोषण सुरू ठेवलेले आहे, ते तात्काळ थांबवावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रोजंदारी मजदुर सेना या संघटनेच्या वतीने रोजंदारी कंत्राटी कामगार प्रतिनिधी तथा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड दिनांक १७ सप्टेंबर २०२४ पासून नगरपरिषद बीड कार्यालया समोर अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाचा १४ वा दिवस सुरू झाला तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कसलीही दखल नगरपरिषद बीड    प्रशासनाने घेतली नाही. जोपर्यंत सफाई कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घेत‌ नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी घेतला आहे.‌ सफाई कामगार यांची अतिअवश्यक सेवेत गनना होते. नगरपरिषद बीड आस्थापनानेत

आमदार पाहिजे नवा म्हणूनच आष्टी मतदारसंघात अमोलराजे तरटेचीच हवा

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात सर्व सामान्य माणसाच्या सुख दुःखात धाऊन जाणारे, शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे युवकांची दिलकी धडकन तथा शरदचंद्र पवार साहेब यांचे कट्टर खंदे समर्थक युवा उद्योजक अमोलराजे तरटे यांचीच हवा असून शहरासह गावागावाच्या पारावर त्याचीच चर्चा सर्व समाज करताना दिसत आहेत. गोरगरिबांचे कैवारी, हक्काचा माणूस, सुशिक्षित उमेदवार म्हणून अमोलराजे तरटे यांचीच सध्या आष्टी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत असून त्यांना आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात वाढता पाठींबा मिळत असून त्यांना पवार साहेब यांनी उमेदवारी दिल्यास बीड लोकसभा उमेदवार सारखा आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात आमदार होऊ शकतो यामुळे पवार साहेबांनी स्वत:ची घरं न भरणाऱ्या उमेदवारा पेक्षा फक्त आणि फक्त विकासकामांनाच प्राधान्य देणार्या सर्वसामान्य गरिबांच्या व्यथा जाणणारा,सर्व सामान्यांचा सुख दुःखात धाऊन जाणारा शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे युवानेते अमोलराजे तरटे यांना विधानसभेत पाठवल्यास मतदार संघाचा विकास काय असतो हा नवीन चेहरा दाखवून देणार असल्याने म्हणून आष्टी पाटोदा शिरूर मत

अलहूदा उर्दू हायस्कूल मध्ये शेख इरशान जावेदचा सत्कार

Image
अलहूदा उर्दू हायस्कूल मध्ये शेख इरशान जावेदचा सत्कार मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद बीड (प्रतिनिधी ) - शहरातील नूर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी बीड द्वारा संचलित अलहूदा उर्दू हायस्कूल येथून दहावी (एसएससी बोर्ड) परिक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेला विद्यार्थी शेख इरशान जावेद याने शालेय व आधुनिक शिक्षणावर परिणाम होऊ न देता पवित्र क़ुरआन मजीद मुखपाठ (हिफ़्ज़) केले. या निमित्ताने शाळेच्या वतीने विद्यार्थी शेख इरशान जावेद याचा शाळेकडून सत्कार करण्यात आला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा ही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना एस.एम.युसूफ़ म्हणाले की, आपल्याला जितके अधिक ज्ञान मिळते तितके आपण जीवनात अधिक वाढतो, विकसित होतो. सुशिक्षित असण्याचा अर्थ केवळ मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित संस्था किंवा संस्थांकडून प्रमाणपत्रे आणि चांगला पगार मिळवणे असा होत नाही. तर याचा अर्थ जीवनात एक चांगला आणि सामाजिक

७ ऑक्टोबर रोजी शिवसंग्रामच्या वतीने आयोजित "होम मिनिस्टर" कार्यक्रमाची जय्यत तयारी

Image
७ ऑक्टोबर रोजी शिवसंग्रामच्या वतीने आयोजित "होम मिनिस्टर" कार्यक्रमाची जय्यत तयारी महिलांनी नाव नोंदणी करावी - मनीषा कोकाटे सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर आणि टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांची असणार उपस्थिती बीड (प्रतिनिधी ) शिवसंग्रामच्या वतीने नवरात्र उत्सवात "जागर मातृ शक्तीचा" हे अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त नवरात्र काळात संबंध महाराष्ट्रत महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा "होम मिनिस्टर" (खेळ रंगला पैठणीचा) हा भव्य कार्यक्रम दि. ०७ ऑक्टोबर रोजी दुपारी ११ वा. आशीर्वाद मंगल कार्यालय, बार्शी रोड, बीड येथे शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी आयोजत केला आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी ८९७२१४७२७२ या क्रमांकावर नाव नोदणी करावी असे आवाहन पंचायत समितीच्या मा.सभापती मनीषा कोकाटे यांनी केले आहे. शिवसंग्रामच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "होम मिनिस्टर" (खेळ रंगला पैठणीचा) हा भव्य कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. महिलांच्या जिवाला थोडा विरंगुळा पाहिजेच यास

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांना लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी लागू केलेल्या सर्व सवलती द्याव्यात - शेख आयेशा

Image
बीड प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.यासह एसटी बस मध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत फ्री मध्ये सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांना सरकारने कोणतीही सवलत जाहीर केलेले नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथीयांचे अधिकृत संख्या 1000 पेक्षा सुद्धा जास्त नसेल मात्र त्यांना समाजासह सरकार सुद्धा अपमानाचीच वागणूक देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ महाराष्ट्रातील तमाम तृतीय पंथीयांना लाडकी बहीण योजनेसह ज्या योजना महिलांसाठी लागू केलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ तृतीयपंथीयांना मिळावा या संदर्भात शासन निर्णय घ्यावा अन्यथा मुख्यमंत्र्याच्या शासकीय वर्षा निवासस्थानासमोर तृतीयपंथीयांना घेऊन हाय हाय आंदोलन करण्याचा इशारा शेख आयेशा यांनी दिला आहे. सरकार लाडक्या बहिणीसह लाडक्या भावांसाठी देखील विविध शासकीय योजना जाहीर करून अमलात आणत आहे. प्रामुख्याने विश्वकर्मा योजना, श्रम कार्ड योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान आणि नवीन व्यवसायासाठी शासकीय कर्ज

अष्टभुजा सार्वजनिक दुर्गोत्सवच्या अध्यक्षपदी विशाल आवाड तर उपाध्यक्ष पदी राजेभाऊ जाधव यांची निवड

Image
परळी (प्रतिनिधी ): गंगासागर नगर येथील चाळीस फूट रोड येथे अष्टभुजा सार्वजनिक दुर्गोत्सव ची कार्यकारणी ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदी विशाल आवाड तर उपाध्यक्ष पदी राजेभाऊ जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष: किशोर जाधव, सचिव: योगेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष: बळिराम नागरगोजे, तर कार्यक्रमाच्या संयोजक पदी संतोष चौधरी, सुजित क्षीरसागर,शाम आवाड मार्गदर्शक: मोहन राजमाने, विष्णू लिखे, बाबू भालेराव, प्रशांत दराडे, भागवत दौंड, शिवगण बहादुरे, सोमनाथ क्षीरसागर, केशव जाधव, विश्वनाथ कापसे, अनंत फल्ले, यांच्या सह राजेश शिंदे, गोविंद गरड, सोमनाथ पांचाळ, विश्वनाथ सावंत, शिवराज वाकडे, कृष्णा कदम, गजानन थळकरी, रवी खोसे, कृष्णा सातपुते, कपिल शिंदे, संतोष मस्के, दीपक खाडे, बालाजी क्षीरसाठ, बालाजी शिंदे, रुपेश जाधव, नरसिंग पौळ, विष्णू आटुळे, बालाजी डांगे, विशाल जाधव, लखन कापसे, महादेव गिराम, पप्पू पौळ, आदी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी सार्वजनिक दुर्गोत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणा

महिला सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती शिंदे यांची आजाद समाज पार्टी कांशीराम बीड शहराध्यक्षपदी निवड

Image
 बीड (प्रतिनिधी ) पूरग्रस्त कॉलनी बीड येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या कु. कीर्ती शिंदे यांची आजाद समाज पार्टी कांशीराम च्या बीड शहराध्यक्षपदी निवड महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडीच्या नेहा ताई शिंदे यांच्या सांगण्यावरून खासदार ॲड. भाई चंद्रशेखर आजाद यांचे हात बळकट करण्यासाठी व महिलांचे प्रश्न शासन प्रशासन दरबारी मांडण्यासाठी बीड जिल्हाध्यक्ष आशिषकुमार चव्हाण यांच्या हस्ते बीड शहराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी आझाद समाज पक्ष जिल्हाध्यक्ष आशिष चव्हाण उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की देशामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत असून त्याला वाचा फोडण्यासाठी महिलांनी स्वबळावर लढण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद रावण हे महिलांच्या संरक्षणासाठी व भारताच्या संविधानासाठी अहोरात्र झटत असून त्यांचे हात बळकट करणे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाची प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने आझाद समाज पक्षाच्या पाठी खंबीरपणे उभे राहणे काळाची गरज आहे. यावेळी जिल्हा बीड जिल

२ महिन्यांपासून दुरावस्थेतील रोहित्र आंदोलनाच्या धसक्याने दोनच दिवसांत नविन रोहित्र बसवले

Image
लिंबागणेश:- ( दि.२८ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश गावठाण मधील कृष्णमंदिरा शेजारील रोहित्राची २ महिन्यांपासून दुरावस्था असल्याने पावसाळ्यात रात्री अपरात्री ग्रामस्थांना जीव मुठीत धरून फ्युज टाकावे लागत असे मात्र केबल वायर जळाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. नविन केबल वायर बसवण्यासाठी महावितरणकडे साहित्य नसल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. अखेर डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि.२६ रोजी लिंबागणेश येथे रास्तारोको आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर २ महिन्यांपासून दुरावस्थेत असलेले रोहित्राच्या ठिकाणी नविन रोहित्र बसविण्यात आले. नविन रोहित्र बसविण्यात यावे यासाठी पत्रकार हरीओम क्षीरसागर, युवा नेते विक्रांत वाणी, तुकाराम गायकवाड, अंकुश गायकवाड अक्षय वाणी यांनी पाठपुरावा करत मेहनत घेतली.त्यामुळे आता वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न सुटला असुन महावितरणचे अभियंता देशपांडे व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. रात्री अपरात्री मुठीत जीव घेऊन फ्युज टाकावे लागत असे आता प्रश्न मिटला   श्रीकृष्ण मंदिर शेजारील रोहित्राचा अर्ध्या गावाला वीजपुरवठा असुन संरक्षक कवच नाही

खरा आदिवासी, खोटा आदिवासी ईगतपुरी- त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीआधीच घमासान

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन -   महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक तोंडावर आलेली असुन सर्वच मतदारसंघात इच्छुक उमेदवार,पक्ष,युती व आघाडी आदीनीं विविध माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचण्याचा धडाका लावला आहे.   ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ही निवडणुक पुर्व हालचालीनां वेग आला असुन यावेळी इच्छुक उमेदवाराच्यां संख्येत मोठीच वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.   निवडणुकी पुर्वीच या मतदारसंघात स्थानिक विरुद्ध उपरे हा वाद रंगत होता.आता या वादात खरा आदिवासी विरुध्द खोटा आदिवासी या वादाने जोर पकडलेला आहे.   बोगस आदिवासी प्रमाणपत्र मिळवुन आदिवासी बांधवाच्यां हक्कावर डल्ला मारण्याचे अनेक प्रकार यापुर्वी उघड झालेलेच आहे.   तसेच आदिवासी बांधवाच्यां जमिनी कवडीमोल भावाने विकत घेण्यासाठी खोटे दस्तावेज बनवुन दाखले मिळवल्याचेही असंख्य प्रकार चव्हाटयावर आलेले आहेत.   आदिवासी बांधवामध्ये खोटया प्रमाणपत्राच्या माध्यमातुन अनेकानीं घुसखोरी केलेली आहे.   विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात हा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरु लागला आहे.   आर्थिक ताकदीच्या बळावर धु

गायरान धारकांसह व विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली धडकला मोर्चा

Image
गायरान धारकांसह व विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली धडकला मोर्चा  सिरसाळा ते बीड पायी लॉंग मोर्चा   बीड प्रतिनिधी - गायरान धारकांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार ठोस भूमिका घेत नाही. शासनाने गायरान धारकांचे प्रश्न मार्गी लावावेत, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे जिल्हाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे नेतृत्वाखाली बुधवारी सिरसाळ्यातून पायी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये शेकडो गायरान धारकांचा समावेश होता. गायरान धारकांच्या नावे व भोगवटा धारक यांच्या नावे पीटीआर देण्यात यावा, रमाई व पंतप्रधान  घरकुलाच्या लाभार्थ्यांना ५ लाख रुपये देण्यात यावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, सर्व मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सिरसाळ्यातून २५ सप्टेंबर रोजी पायी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

लोकशाही पत्रकार संघाच्या माजलगाव तालुका सचिवपदी समाधान गायकवाड यांची निवड

Image
माजलगाव प्रतिनिधी दि.२४ सप्टेंबर रोजी लोकशाही पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यालयामध्ये लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापकीय अध्यक्ष भागवतजी वैद्य व ग्रामपंचायत सरपंच विकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सखाराम पोहिकर यांच्या उपस्थितीमध्ये माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथे लोकोपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबवणारे दैनिक युवतीराजचे तालुका प्रतिनिधी समाधान गायकवाड यांची लोकशाही पत्रकार संघाच्या माजलगाव तालुका सचिवपदी निवड करण्यात आली व त्यांना माजलगाव तालुका सचिव पदी निवड झाल्याबदल नियुक्ती पत्र देताना लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापकीय अध्यक्ष भागवतजी वैद्य व ग्रामपंचायत संरपंच विकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष व दैनिक विदर्भ सत्यजित व साय दैनिक साई संध्याचे बीड जिल्हा प्रतिनिधी सखाराम पोहिकर यांच्या उपस्थितीमध्ये हे नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नियुक्ती पत्र घेताना समाधान गायकवाड म्हणाले की लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापकीय अध्यक्ष भागवतजी वैद्य व ग्रामपंचायत सरपंच विकास रुमितीचे प्रदेश उपाध्याक्ष सखाराम पोहिकर यांनी माझ्यावर माजलगाव तालु

आपसातील "कलगीतुरा" बंद करा "40" वर्षांच्या विकासाचा अहवाल जनतेपुढे मांडा -नितीन जायभाये

Image
आपसातील "कलगीतुरा" बंद करा "40" वर्षांच्या विकासाचा अहवाल जनतेपुढे मांडा - नितीन जायभाये  बीड शहर बचाव मंचाने दिले महाभ्रष्ट सत्ताधाऱ्यांना आव्हान   बीड प्रतिनिधी - एकीकडे बीड शहरातील जनतेवर संकटांचे डोंगर कोसळत असताना. या सत्ताधाऱ्यांना कलगीतुरा खेळण्याचे नाटक सुचतेच कसे? पावसाचे आणि गटारांचे पाणी बिडकरांच्या घरात आणि दुकानांमध्ये "घुसवून* बीडच्या जनतेला जिवंतपणे नरकात पाठवणाऱ्या या नितीभ्रष्ट झालेल्या महाभ्रष्ट नरकासुरांना गेल्या 40 वर्षात बीडचा काय विकास केला याचा हिशोब जनतेपुढे मांडवाच लागेल. या बीड शहरात बाजारपेठेंच्या मुख्य रस्त्यावर कुठेही अद्यावत महिला स्वच्छतागृहे हे महाभृष्ट सत्ताधारी आजपर्यंत बांधू शकले नाहीत हाच काय यांचा विकास ? बीड शहरातील आया- बहिणींच्या मायमाऊलींच्या बद्दल असलेली तळमळ ?  हेच का यांचे  "पर्व "? कधी यांनी बीडमध्ये उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी व औद्योगिक क्षेत्र आणण्यासाठी प्रयत्न केले ? कायम फक्त आपलीच घरं भरली. बीड करांना इतर शहरांमध्ये गेल्यानंतर तेथील नगरपालिका मूलभूत सोयी सुविधा किती चांगल्या पद्धती

नाली साफ सफाई करून मुरूम टाकून पत दिवे लावण्यात यावेत:-पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे

Image
  बीड शहरातील काझी नगर बालेपिर या ठिकाणी भरपूर लोकसंख्या आहे तरी त्या ठिकाणी आज पर्यंत रस्ता बनवण्यात आला नाही. नाल्या साप केल्या जात नाहीत व त्या ठिकाणी पथदिवे सुद्धा लावले जात नाहीत.  गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांची सत्ता आहे त्यांनी काय दिवे लावलेत हे यामधून निदर्शनास येत आहे सत्ता परिवर्तन होणे काळाची गरज आहे तोपर्यंत सर्वसामान्यांचे अडी अडचणी व जनसामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. काझी नगर बालेपिर या ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर पूर्णपणे चिखल झालेला आहे व नाली साफ न केल्यामुळे नाली मधील सर्व घाण व पाणी हे रस्त्यावर येत आहे त्यामुळे तेथील नागरिकांना रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या ठिकाणी रोडवर मुरूम टाकने व नाली साफ करणे पथदिवे लावावेत नगरपरिषद यांना ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे चार दिवसाच्या आत त्यांनी आमची मागणी मान्य जर नाही केली तर तेथील घाण नगर परिषद सिओ यांच्या केबिनमध्ये टाकून ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने आंदोलन केले जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी.

बीड शहरा बचाव मंचने प्रश्न हाती घेतला की लगेच नगरपालिकेने घेतली दखल

Image
 जेसीपी च्या साह्याने क्रांती कॉलनी, मित्र नगर भागातील कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरुवात  बीड प्रतिनिधी – बीड शहरात अनेक नागरी समस्या आहेत या समस्या बीड बचाओ मंच स्थापन करून अगोदर समजून घेतल्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या व आवश्यक अशा प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या प्रयत्नामुळे नगरपालिका प्रशासन आता हळूहळू कुठेतरी काम करताना दिसत आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. अनेक सकल भागामध्ये पाणी जमा होते, रस्त्यात खड्डे पडले आहेत. या सर्व गोष्टींकडे आता सुजान नागरिक लक्ष घालून प्रश्न सोडण्यासाठी बीड शहर बचाव मंचच्या सर्व टीमला संपर्क करत आहेत. व काही प्रमाणात का होईना त्या समस्या सोडवायला सुरुवात झाली आहे त्यामुळेच हे काम होऊ शकले त्यामुळे नागरिकांनी आभार देखील मानले आहे. त्याचे झाले असे की बीड शहर बचाव मंच अंतर्गत सदस्य डॉ. अशोक मसलेकर व नितीन जायभाये यांच्या संयुक्त प्रयत्नातून दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी क्रांती कॉलनी, मित्र नगर येथील चार प्लॉट मधील घनकचरा साफ करून कचऱ्याचे ढीग जेसीबीच्या साह्याने उचलायला केली सुरुवात. बीड शहर बचाव च्या सर्व पदाधिकारी टीमचे व येथील रहिवाशांनी डॉ.अशो

माजलगाव विधानसभा मतदारसंघ भव्य कार्यकर्ता निर्धार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- युवा नेते संभाजीराव दराडे

Image
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी  मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या वतीने माजलगाव विधानसभा मतदारसंघ माननीय मोहनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळाव्यास मोठ्या संख्येने माजलगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी दि .29/9/24 रविवार रोजी सकाळी 11 वाजता जुना मोंढा मैदान माजलगाव येथे भव्य कार्यकर्ता निर्धार मेळावा आयोजित केला आहे. यात सर्वांचे लाडके सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असणारे आदरणीय मोहनदादा जगताप यांचे सर्व समावेशक कार्य असून ते सर्वश्रुत आहे.या भागात कारखाना छत्रपतीच्या उभारणीपूर्वी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था होती, शेतकऱ्यांची अडवणूक केल्या जात होतात ,भाव व्यवस्थित दिला जात नव्हता, परंतु छत्रपतीच्या उभारणीने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे शेतकरी हित सांभाळत छत्रपती सहकारी साखर कारखान्याची उभारणी अत्यंत कष्टातून झाली आहे या कारखान्याने शेतकऱ्यांचे हित साधले आहे शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना चांगला भाव दिला आहे बेरोजगारांना काम दिले आहे, त्यामुळे हा कारखाना परिसरातील शेतकऱ्यां

पाटोदा शहराला कोणी वाली नसल्याने शहरातील प्रमुख महामार्गावर सर्वत्र अंधार

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दसरा अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना देखील पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या चुंबळी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच मांजरसुबा मार्गावरील विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी पाटोदा शहराच्या प्रमुख बाजारपेठे मध्ये सर्वत्र अंधारच अंधार असतो त्या अंधाराचा फायदा घेऊन रात्री अपराञी मध्ये व्यापार पेठ असल्याने चोऱ्याही होऊ शकतात तसेच हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दसरा जवळ आल्याने पाटोदा नगरपंचायतने शहरातील प्रमुख बाजार पेठ असलेल्या छञपती शिवाजी महाराज चौक ते चुंबळी फाटा रस्त्यावरील तसेच मांजरसुबा मार्गावरील विद्युत पोल वर तात्काळ विद्युत दिवे बसवावेत अशी मागणी पाटोदा शहरातील व्यापारी वर्ग करत आहे

बीड आयटीआय ला लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव

Image
बीड आयटीआय ला लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव लोकनेत्याच्या कार्याचा मरणोत्तर गौरव - प्रभाकर कोलंगडे बीड (प्रतिनिधी )लोकनेते विनायकराव मेटे यांच्या प्रथम जयंती निमित्त दी. ३० जून २०२३ रोजी बीड येथेल आयोजित कार्यक्रमात राज्याचे मा. उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात बीड येथील आयटीआय ला लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव देण्याचे जाहीर घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे लोकनेते विनायकराव मेटे यांचे चाहते आणि शिवसंग्राम चे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांनी त्यांच्या हयातीत अनेक गोरगरीब दिन दुबळ्या आणि वंचितांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून काम केले मराठा समाजाकरिता आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक या गोष्टींचा पाठपुरावा साहेबांनी त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत केला. त्याचबरोबर एमपीएसई विद्यार्थांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था त्यांची वयोमर्यादा वाढवणे , पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढ

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत तुलसी इंग्लिश स्कूल उपविजेता

Image
 बास्केटबॉल विभागीय स्पर्धेसाठी तुलसी इंग्लिश स्कूल संघ पात्र   बीड प्रतिनिधी - तुलशी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत चमकदारित कामगिरी करत, द्वितीय क्रमांक म्हणजेच उपविजेता ठरला आहे.संघाने दि.25 सप्टेंबर रोजी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी येथे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत्या.यात तुलसी इंग्लिश स्कूल ने सहभाग नोंदवून जिल्ह्यात अंडर -17 या ग्रुप मध्ये प्रथम मॅच B.H.E.L इंग्लिश स्कूल परळी यांना एकतर्फी पराभूत करून द्वितीय फेरीत महावीर कोठारी विद्यालय कडा आष्टी या संघास पराभूत केले. तसेच सेमी फायनल मध्ये सिंधफणा पब्लिक स्कूल माजलगाव संघास एकतर्फी पराभूत करून फायनल मध्ये प्रवेश केला. फायनल मध्ये अटीतटीच्या सामन्यात चंपावती संघासोबत अवघ्या काही पॉइंट्स ने पराभव स्विकारावा लागला त्यामुळे तुलसी इंग्लिश स्कूल ने जिल्हा मध्ये द्वितीय येण्याचा मान पटकावला आहे. त्या सोबतच विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेस प्रवेश निश्चित केला आहे. या बद्दल संघातील स्पर्धक विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे प्राचार्य

लोकशाही पत्रकार संघ पोलीस मित्र विकास समिती जि. अ. पदी राणी झिंजूर्ड

Image
    किरण दोंदे संभाजीनगर   संभाजीनगर येथील लोकशाही पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात मंगळवारी दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी झालेल्या बैठकीत लोकशाही पत्रकार संघ पोलीस मित्र विकास समिती च्या जिल्हा अध्यक्ष पदी राणी शांतीनाथ झिंजूर्ड यांची निवड लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बी.बी वैद्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष अयुब पठाण, प्रदेश अध्यक्ष माणिक वाघमारे, प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी निलोफर शेख,प्रदेश उपाध्यक्ष साजेद सय्यद,मराठवाडा अध्यक्ष वसीम आजाद, प्रभाकर पांडे,मराठवाड्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय नरनाळे, संभाजीनगर पूर्व जिल्हा अध्यक्ष अनिस कुरेशी, पश्चिम जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ नेतने यांनी केली.यावेळी निवड पत्र देताना सं. अ. तथा राष्ट्रीय अध्यक्ष भागवत (बीबी ) वैद्य, प्रदेश कार्याध्यक्ष अयुब भाई पठाण, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष किरण दोंदे मॅडम हे होते. राणी झिंजूर्डे यांचे सामाजिक कार्य तसेच पोलीस स्टेशन चे नेहमी कामे करत असल्यामुळे त्यांचे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये ओळखी आहेत. या कार्याचा आढावा घेऊन राणी झिंजूर्डे याच

लिंबागणेश येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन

Image
 लिंबागणेश:- (दि.२६) बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जाचक ई पीक पाहणी अट रद्द करण्यात यावी,अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, २५ टक्के अग्रीम पिक विमा तातडीने द्यावा, थकीत पीक कर्जामुळे शेतकऱ्यांच्या बचत खात्याला बँकेने लावलेला होल्ड काढण्यात यावा. आदी मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२६ सप्टेंबर गुरुवार रोजी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश येथे बैलगाड्यांसह चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे  अ)मागणी क्रमांक १ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा  बीड जिल्ह्यातील ६१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी ,कापुस ,उडीद, तुर,कांदा,पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक अनुदान देण्यात यावे. आ)मागणी क्रमांक २ २५ टक्के अग्रीम पिक विमा तातडीने देण्यात यावा  सप्टेंबर मध्ये बीड जिल्ह्यातील ६१ महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्

लेखक नवनाथ गायकर यांना प्रतिभा साहित्य संघ अकोटचा राज्यस्तरीय कथा स्पर्धेचा प्रथम पुरस्कार प्रदान

Image
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी-     अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष, नाशिक जिल्हाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक नवनाथ अर्जुन पा. गायकर यांना प्रतिभा साहित्य संघ अकोट,जि.अकोला(विदर्भ) आयोजीत "उत्सव पीक पाण्याचा " उपक्रमातंर्गत राज्यस्तरीय कथा स्पर्धेस प्रथम पुरस्कार जाहिर झाला.या पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच अकोट येथे संपन्न झाला आहे.   लेखक नवनाथ गायकर यांच्या जिमीन या कथेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.या कथेच्या माध्यमातुन जमिनीला काळी आई मानणारी पिढी अस्तंगत होत चालली असुन, जमिनी विका आणि दोन दिवस आलेल्या पैशावर मजा करा.मात्र त्या नंतर केवळ आत्महत्ये शिवाय पर्याय नाही असा संदेश देणारी ही कथा आजच्या चंगळवादी पिढीचं वास्तव पण तितकच भयाण चित्रण करते अशा शब्दात या स्पर्धेचे प्रमुख परिक्षक जेष्ठ कवी विजय सोसे (परतवाडा, अमरावती) यांनी कौतुक केले.   गायकर यांना जेष्ठ शेतकरी अभ्यासक प्रशांत गावडे, अँड. गजानन पुंडकर, गोपाळ कोल्हे, प्रतिभा साहित्य संघ संस्थापक अध्यक्ष विठ्ठल दादा कुलट आदी मान्यवराचें हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,श

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळी विधानसभेचे लाडके युवराज पोहनेर येथील बौद्ध बांधवांना बौद्ध विहार बांधून देऊन न्याय देतील काय! - प्रेम जगतकर

Image
परळी प्रतिनिधी -  परळी विधानसभेतील पोहनेर या गावाला माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या कार्य काळामध्ये दत्तक घेतले होते या कार्यकाळामध्ये तेथील बौद्ध विहाराची दयनीय अवस्था झालेली असताना सुद्धा जाणून-बुजून बौद्ध विहाराच्या विकासाकडे दुर्लक्ष करून तेथील बौद्धांची फक्त मते घेण्यापुरता दोन वेळेस पायाभरणी सोहळा घेतला असे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले . पण प्रत्यक्षात मात्र काम सुरू झाले नाही आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहता खालील फोटोतील बौद्ध विहाराची दयनीय झालेली अवस्था वंचित बहुजन आघाडी परळी विधानसभेच्या टीमने परळी विधानसभा मतदारसंघ अभियानाच्या निमित्ताने पोहनेर या गावी संपर्क साधण्यासाठी गेलो असता गावकऱ्यांच्या वतीने ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली व आम्हाला बौद्ध विहार बांधून देऊन न्याय द्या असा टाहो फोडण्यात आला.  याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे वंचित युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष राजेश सरवदे वंचित बहुजन युवक आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर युवक आघाडी शहर उपाध्यक्ष शुद्धोधन आचार्य उपस्थित होते. त्यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना

पेन्शन धारकांचे प्रश्न सोडवले तरच सरकारला पुन्हा सत्तेची खुर्ची मिळेल - कमांडर अशोक राऊत

Image
  बीडमध्ये ईपीएस 95 संघर्ष समितीचा पत्रकार परिषदेमधून सरकारला थेट इशारा बीड प्रतिनिधी   कामगारांना सरकार केवळ 1171 रुपये पेन्शन पोटी देते. यामध्ये जगणे अवघड आहे. त्यामुळे किमान मासिक पेन्शन 7500 रुपये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सरकारने कोणताही भेदभाव न करता तात्काळ मंजूर करावेत. जर आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर या देशातील विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या ही 78 लाख आहे. शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या सव्वा कोटी आहे. या पेन्शनधारकांवर अवलंबून असलेले त्यांना मानणारे किमान पाच मतदार गृहीत धरले तरी देखील आमची संख्या साडेतीन कोटीच्या पुढे जाते. त्यामुळे सरकारने आता आपली भूमिका तात्काळ जाहीर करावी. अन्यथा आम्ही आमची भूमिका आमच्या बोटाने म्हणजेच मतदानाने व्यक्त करूत.जर मागण्या मान्य केल्या तर या सरकारला पुन्हा संधी देऊ. जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर लोकसभेमध्ये आमच्या बोटांची ताकद सरकारला जी दिसली,जाणवली तीच ताकद विधानसभेमध्ये यापेक्षा अधिक जोमाने दिसून येईल, असा थेट इशारा इपीएस 95 संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी द

कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Image
कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा बीड (प्रतिनिधी ) - सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा बीड जिल्ह्याचे जावई लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटामुळे दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.   कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झाली आहे. परदेशात कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. यावेळी चित्रपटाचे अनेकांनी कौतुक करत लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वाणिज्य दुत, पनामा, हेड ऑफ रीजन मेरीटाईम ऑथरिटी जिजस कॅंपोस, डॉ. अमजदखान, नाशिकच्या विभागीय आयुक्त संगीता धायगुडे यांच्या हस्ते अल्ताफ शेख यांना सन्मानित करण्यात आले. कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले दि

हरणाच्या पाडसाचे कुत्र्याच्या तावडीतून प्राण वाचवले; वनविभागाकडे सुपुर्त केले

Image
  लिंबागणेश :- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील शिवम कल्याण कोकाटे यांच्या शेतात सोयाबीन काढत असताना हरणाच्या पाडसावर रानातील कुत्र्यांनी हल्ला केला असता कल्याण कोकाटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याची फोनवरून डॉ.गणेश ढवळे आणि पत्रकार हरीओम क्षीरसागर यांना कल्पना दिली. आम्ही दोघांनी पावसाने झालेल्या चिखलामुळे मोटार सायकल जात नसल्याने एक किलोमीटर चिखलातून जाऊन पाडसाला ताब्यात घेऊन बीड वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे यांना फोन वरून कल्पना दिली. त्यांनी वनपाल अंगद बहिरवाळ यांना फोन वरून पाडसाला ताब्यात घेण्यास सांगितले.वनपाल अंगद बहिरवाळ यांच्या सांगण्यावरून वनविभागातील कर्मचारी अनिल शेळके, मधुकर वायभट, हनुमंत वायभट हे लिंबागणेश येथे डॉ.गणेश ढवळेंच्या घरी सायं ८ वाजता पोहोचले.अगोदरच भेदरलेल्या पाडसाला डॉ.गणेश ढवळे यांनी घरी आणुन पाणी पाजले.त्यानंतर वनविभागाचे कर्मचा-यांना सुपुर्त करण्यात आले. यावेळी पत्रकार हरीओम क्षीरसागर,गणपत तागड, कल्याणबापु वाणी , बालासाहेब जाधव उपस्थित होते.

बेजबाबदार मुख्याधिकारी नीता अंधारे यांचा कारभार सफाई कामगारांच्या मुळावर कामगारांमध्ये संताप - आगळे सर

Image
बीड (प्रतिनिधी) बीड शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन डेंगू , मलेरिया अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता आहे. शहरात वावरताना नागरिकांना नाकावर रुमाल,‌ मास्क वापरून बाहेर पडावे लागत आहे. कंत्राटी सफाई कामगारांना ०१ जून २०२३ रोजी अयोग्य व बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्यामुळे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदरील कामगारांना कामावर घेऊन शहरातील स्वच्छता राखण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांच्याकडे पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलने सुद्धा केली. पुन्हा एकदा दिनांक १७ सप्टेंबर २०२४ पासून ते आजतागायत सलग ८ दिवस झाले नगरपरिषद बीड कार्यालयासमोर रोजंदारी मजदुर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. तरीसुद्धा बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीता अंधारे ह्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून सदरील मुख्याधिकारी मनमानी कारभार करून बीड शहराच्या जनतेस व कंत्राटी सफाई कामगारांना वेठीस धरत आहेत, असा गंभीर आरोप रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय मह

लक्ष्मण हाके यांना अटक करा स्वराज्य पक्षाची मागणी

Image
सरकारने शिवभक्तांच्या भावनांचा आदर ठेवुन छत्रपती संभाजीराजे यांचा विषयी चुकीच बोलनार्या लक्ष्मन हाके यांना अटक करावी नाहीतर होणार्या परिणामांची जाबबदारी स्वीकारावी - (जिल्हाप्रमुख स्वराज्य रुपेश नाठे .) महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणा साठी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. या मागणीसाठी मनोज दादा जरांगे गेल्या सात दिवसां पासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी व तब्यतीची विचारपुस करण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे यांची भेट घेतली या भेटीनंतर मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी चाललेल्या लढ्याला अधिक पाठबळ मिळाले आहे. दरम्यान, ओबीसी आंदोलन कर्ते लक्ष्मण हाके यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आणि अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. हाके यांच्या या वक्तव्यामुळे मराठा समाजामध्ये व शिवभक्तां मधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नाशीक मधे जिल्हाप्रमुख रुपेश नाठे यांचा नेत्रुत्वा मधे हाके यांच्या टीकेचा तीव्र निषेध केला गेला त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका कराल तर मराठा समाज

डीपीआय चा महा एल्गार सभेस उपस्थित रहा-अँड कारके,सुतार

Image
 गेवराई(प्रतिनिधी )   साहित्यसम्राट, महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले उभे आयुष्य मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले. समाजातील वंचित, पीडित व शोषित समाज घटकांचा आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया प्रदेश अध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे दिनांक 27/09/2024 रोजी मुंबई येथील भायखळा अण्णाभाऊ साठे सभा सभागृह येथे हजारोच्या संख्येने समाजांनी उपस्थित राहावे असे एडवोकेट सोमेश्वर कारके व संजय भाऊ सुतार यांनी केले आहे .  पुढे  म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या वास्तवदर्शी साहित्यातून माणूस व मानवीवृत्तीचे दर्शन घडवले आहे. शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनीतून दिनदुबळ्यांची, उपेक्षित, कष्टकरी, पीडित, हालअपेष्टा सहन करत जगणाऱ्या घटकांच्या वेदनांची जाण समाजाला करुन दिलेली आहे. त्यांनी समता व बंधुत्वाचे विचार समाजात रुजवले. अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक परिवर्तना

कंत्राटी सफाई कामगारांनी एकत्र येऊन उपसले अन्नत्याग उपोषणाचे हत्यार

Image
बीड ( प्रतिनिधी ) दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी आज अन्नत्याग उपोषणाचा सातवा दिवस.नगरपरिषद बीड कार्यासमोर दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी अन्न त्याग उपोषणाला सुरुवात केली. अन्न त्याग उपोषण करते भाई राजेश कुमार जोगदंड यांना भेटायला सर्व कंत्राटी सफाई कामगार एकवटला होता. यावेळी सफाई कामगार म्हणाले की आता माघार घ्यायची नाही सर्वजण एका ताकतीने भाई राजेश कुमार जोगदंड यांच्या मागे उभे राहू असा संकल्प करण्यात आला. कंत्राटी सफाई कामगारांनी किमान वेतना सहित प्रचलित कामगार कायद्याच्या सोयी - सुविधा मिळाव्यात म्हणून नगरपरिषद बीड कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले होते, त्याचा राग मनात धरून दिनांक ०१ जून २०२३ रोजी सकाळी कामावर आल्या बरोबर सफाई कामगारांना तोंडी सूचना देऊन अयोग्य व बेकायदेशीर रित्या कामावरून कमी केले. आज तब्बल 15 महिने होऊन गेले तरी कंत्राटी सफाई कामगारांना कामावर रुजू करून घेतले नाही. त्यामुळे संपूर्ण बीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरले. कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे बीड मधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील जिजामाता चौक, मसरत नगर व