७ ऑक्टोबर रोजी शिवसंग्रामच्या वतीने आयोजित "होम मिनिस्टर" कार्यक्रमाची जय्यत तयारी
७ ऑक्टोबर रोजी शिवसंग्रामच्या वतीने आयोजित "होम मिनिस्टर" कार्यक्रमाची जय्यत तयारी
महिलांनी नाव नोंदणी करावी - मनीषा कोकाटे
सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर आणि टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांची असणार उपस्थिती
बीड (प्रतिनिधी) शिवसंग्रामच्या वतीने नवरात्र उत्सवात "जागर मातृ शक्तीचा" हे अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त नवरात्र काळात संबंध महाराष्ट्रत महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा "होम मिनिस्टर" (खेळ रंगला पैठणीचा) हा भव्य कार्यक्रम दि. ०७ ऑक्टोबर रोजी दुपारी ११ वा. आशीर्वाद मंगल कार्यालय, बार्शी रोड, बीड येथे शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी आयोजत केला आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी ८९७२१४७२७२ या क्रमांकावर नाव नोदणी करावी असे आवाहन पंचायत समितीच्या मा.सभापती मनीषा कोकाटे यांनी केले आहे.
शिवसंग्रामच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "होम मिनिस्टर" (खेळ रंगला पैठणीचा) हा भव्य कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. महिलांच्या जिवाला थोडा विरंगुळा पाहिजेच यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन शिवसंग्राम अध्यक्ष डॉ ज्योती विनायकराव मेटे यांनी केले आहे. या कार्यक्रमात पारंपरिक खेळांबरोबर यंदा महिलांना "होम मिनिस्टर" सारखे आधुनिक खेळही खेळायला मिळणार आहेत. जोडीला आणखीही बरेच स्पर्धात्मक उपक्रम आहेत. यात भाग घेणाऱ्या महिलांसाठी मोठ-मोठी बक्षिसं मिळणार आहेत. सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर आणि टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांची असणार उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे .कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिला भगिनींनी आपले नाव, पत्ता, वय लिहून ८९७२१४७२७२ या क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज पाठवून नाव नोंदणी करायची आहे असे पंचायत समितीच्या मा.सभापती मनीषा कोकाटे यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment