प्रिया डोईफोडे यांच्या प्रयत्नातून अचानक नगर भागातील सिमेंट रस्ता, नाली कामाचा शुभारंभ

प्रिया डोईफोडे यांच्या प्रयत्नातून अचानक नगर भागातील सिमेंट रस्ता, नाली कामाचा शुभारंभ 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड उपजिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ नाईकवाडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
बीड दि. 30 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या निधीतून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या जिल्हाध्यक्षा प्रियाताई डोईफोडे यांच्या प्रयत्नातून बीड शहरातील प्रभाग क्रमांक 18 येथील कनकालेश्वर मंदिर परिसरातील अचानक नगर भागात सिमेंट रस्ता आणि नाली कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भाऊ नाईकवाडे यांच्या हस्ते दिनांक 30 सप्टेंबर रोजी संपन्न झाले. 

या भागात अनेक दिवसांची मागणी आज युवती जिल्हाध्यक्ष प्रिया डोईफोडे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवती उपजिल्हाध्यक्ष नुजत सिद्दीकी,युवती जिल्हा सचिव निता माळी, युवती शहराध्यक्ष मोहिनी ओव्हाळ, सय्यद मोहम्मद, शेख ताहेर भाई, सद्दा खान, शेख नविद, झैद कादरी यांच्यासह स्थानिक भागातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अचानक नगर हा परिसर विकास कामांपासून वंचित राहिलेला आहे. स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या बीड जिल्हाध्यक्षा प्रियाताई डोईफोडे यांनी राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्याकडे अचानक नगर मधील रस्ता आणि नाली कामाची मागणी केली होती. धनंजय मुंडे यांनी देखील तत्काळ या रस्त्यासाठी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. 

आज या रस्ता आणि नाली कामाचे भूमिपूजन व कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भाऊ नाईकवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. अविनाश भाऊ नाईकवाडे व युवती जिल्हाध्यक्ष प्रिया डोईफोडे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी अचानक नगर भागात सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम होणार असल्याने स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी