गायरान धारकांसह व विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली धडकला मोर्चा
गायरान धारकांसह व विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली धडकला मोर्चा
सिरसाळा ते बीड पायी लॉंग मोर्चा
बीड प्रतिनिधी - गायरान धारकांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार ठोस भूमिका घेत नाही. शासनाने गायरान धारकांचे प्रश्न मार्गी लावावेत, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे जिल्हाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे नेतृत्वाखाली बुधवारी सिरसाळ्यातून पायी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये शेकडो गायरान धारकांचा समावेश होता.
गायरान धारकांच्या नावे व भोगवटा धारक यांच्या नावे पीटीआर देण्यात यावा, रमाई व पंतप्रधान
घरकुलाच्या लाभार्थ्यांना ५ लाख रुपये देण्यात यावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, सर्व मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सिरसाळ्यातून २५ सप्टेंबर रोजी पायी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सदरील मोर्चा हा शैलेश पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
या मोर्चा विविध संघटनेने पाठिंबा दर्शवला गौतम दादा भालेराव मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे, करचुडीचे जयसिंग वीर व गावकरी,ऑल इंडिया पँथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, बसपाचे प्रशांत वासनिक व आंबेडकर संघटनेचा पाठिंबा लॉंग मोर्चा दिला या मोर्चास उपस्थित कविता घोरपडे महिला मराठवाडा कार्य अध्यक्ष पंडित झिंजुर्डे, सचिव सीताताई भोसले, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी व जिल्ह्यातील प्रमुख तालुका अध्यक्ष व गायरान धारक उपस्थित होते.
Comments
Post a Comment