डीपीआय चा महा एल्गार सभेस उपस्थित रहा-अँड कारके,सुतार
गेवराई(प्रतिनिधी) साहित्यसम्राट, महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले उभे आयुष्य मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले. समाजातील वंचित, पीडित व शोषित समाज घटकांचा आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया प्रदेश अध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे दिनांक 27/09/2024 रोजी मुंबई येथील भायखळा अण्णाभाऊ साठे सभा सभागृह येथे हजारोच्या संख्येने समाजांनी उपस्थित राहावे असे एडवोकेट सोमेश्वर कारके व संजय भाऊ सुतार यांनी केले आहे .
पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या वास्तवदर्शी साहित्यातून माणूस व मानवीवृत्तीचे दर्शन घडवले आहे. शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनीतून दिनदुबळ्यांची, उपेक्षित, कष्टकरी, पीडित, हालअपेष्टा सहन करत जगणाऱ्या घटकांच्या वेदनांची जाण समाजाला करुन दिलेली आहे. त्यांनी समता व बंधुत्वाचे विचार समाजात रुजवले. अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे. अण्णाभाऊ साठे यांनी ३५ काबंदऱ्या, १० लोकनाट्य, २४ लघुकथा, १० पोवाडे, एक नाट्य आणि एक प्रवास वर्णन असे विपुल लेखन केले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारने १९६१ मध्ये उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार दिला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या सामाजिक न्यायाचे कौतुक जेवढे करावे तितके कमी आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन देशाचा सर्वौच्च नागरी पुरस्कार भारत रत्न देऊन त्यांना सन्मानित करावे, असे प्रसिद्धी पत्रकार द्वारे डीपीआयचे गेवराई तालुक्यांचे अमोल सुतार एडवोकेट सोमेश्वर कारके, तालुका अध्यक्ष संजय भाऊ सुतार यांनी म्हटले आहे
Comments
Post a Comment