आपसातील "कलगीतुरा" बंद करा "40" वर्षांच्या विकासाचा अहवाल जनतेपुढे मांडा -नितीन जायभाये
आपसातील "कलगीतुरा" बंद करा "40" वर्षांच्या विकासाचा अहवाल जनतेपुढे मांडा -नितीन जायभाये
बीड शहर बचाव मंचाने दिले महाभ्रष्ट सत्ताधाऱ्यांना आव्हान
बीड प्रतिनिधी - एकीकडे बीड शहरातील जनतेवर संकटांचे डोंगर कोसळत असताना. या सत्ताधाऱ्यांना कलगीतुरा खेळण्याचे नाटक सुचतेच कसे? पावसाचे आणि गटारांचे पाणी बिडकरांच्या घरात आणि दुकानांमध्ये "घुसवून* बीडच्या जनतेला जिवंतपणे नरकात पाठवणाऱ्या या नितीभ्रष्ट झालेल्या महाभ्रष्ट नरकासुरांना गेल्या 40 वर्षात बीडचा काय विकास केला याचा हिशोब जनतेपुढे मांडवाच लागेल. या बीड शहरात बाजारपेठेंच्या मुख्य रस्त्यावर कुठेही अद्यावत महिला स्वच्छतागृहे हे महाभृष्ट सत्ताधारी आजपर्यंत बांधू शकले नाहीत हाच काय यांचा विकास ? बीड शहरातील आया- बहिणींच्या मायमाऊलींच्या बद्दल असलेली तळमळ ?
हेच का यांचे
"पर्व "? कधी यांनी बीडमध्ये उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी व औद्योगिक क्षेत्र आणण्यासाठी प्रयत्न केले ? कायम फक्त आपलीच घरं भरली. बीड करांना इतर शहरांमध्ये गेल्यानंतर तेथील नगरपालिका मूलभूत सोयी सुविधा किती चांगल्या पद्धतीने पुरवितात हे पाहून अक्षरशः लाज वाटते शरमेने मान खाली जाते. तिथे भेटलेली लोकं म्हणतात अहो तुम्ही बीडचे का आजही खूपच मागासलेला असलेला भाग आहे तुमचा... तेव्हा खरंच आपल्या सर्व "विकास पुरुषांबद्दल" फार अभिमान वाटतो... कधी थांबणार हे सगळं..? कलगीतुरे थांबवा आणि विकासाचा अहवाल जनतेपुढे सादर करा ही मी जिम्मेदारी पूर्वक बीड शहरातील जनतेच्या वतीने व बीड शहर बचाव मंचाच्या वतीने मागणी करत आहे.
Comments
Post a Comment