पाटोदा शहराला कोणी वाली नसल्याने शहरातील प्रमुख महामार्गावर सर्वत्र अंधार
पाटोदा (गणेश शेवाळे) हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दसरा अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना देखील पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या चुंबळी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच मांजरसुबा मार्गावरील विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी पाटोदा शहराच्या प्रमुख बाजारपेठे मध्ये सर्वत्र अंधारच अंधार असतो त्या अंधाराचा फायदा घेऊन रात्री अपराञी मध्ये व्यापार पेठ असल्याने चोऱ्याही होऊ शकतात तसेच हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दसरा जवळ आल्याने पाटोदा नगरपंचायतने शहरातील प्रमुख बाजार पेठ असलेल्या छञपती शिवाजी महाराज चौक ते चुंबळी फाटा रस्त्यावरील तसेच मांजरसुबा मार्गावरील विद्युत पोल वर तात्काळ विद्युत दिवे बसवावेत अशी मागणी पाटोदा शहरातील व्यापारी वर्ग करत आहे
Comments
Post a Comment