बेजबाबदार मुख्याधिकारी नीता अंधारे यांचा कारभार सफाई कामगारांच्या मुळावर कामगारांमध्ये संताप - आगळे सर


बीड (प्रतिनिधी) बीड शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन डेंगू , मलेरिया अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता आहे. शहरात वावरताना नागरिकांना नाकावर रुमाल,‌ मास्क वापरून बाहेर पडावे लागत आहे. कंत्राटी सफाई कामगारांना ०१ जून २०२३ रोजी अयोग्य व बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्यामुळे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदरील कामगारांना कामावर घेऊन शहरातील स्वच्छता राखण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांच्याकडे पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलने सुद्धा केली. पुन्हा एकदा दिनांक १७ सप्टेंबर २०२४ पासून ते आजतागायत सलग ८ दिवस झाले नगरपरिषद बीड कार्यालयासमोर रोजंदारी मजदुर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. तरीसुद्धा बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीता अंधारे ह्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून सदरील मुख्याधिकारी मनमानी कारभार करून बीड शहराच्या जनतेस व कंत्राटी सफाई कामगारांना वेठीस धरत आहेत, असा गंभीर आरोप रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
   याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ०१ जून २०२३ रोजी कंत्राटी सफाई कामगारांना अयोग्य व बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले आहे. बीड शहर जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांना या घाणीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेणे गरजेचे आहे. नगरपरिषद बीडमध्ये मागील 22 ते 23 वर्षांपासून सदरील सफाई कामगार वेग वेगळ्या कंत्राटदारा मार्फत कार्यरत होते. परंतु त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नव्हते व सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांनी न्याय हक्कासाठी रोजंदारी मजदुर सेना ही संघटना स्थापन केल्यामुळे सन २०१७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मा. नवल किशोर राम यांनी कंत्राटी सफाई कामगारांना एप्रिल व मे २०१७ ला किमान वेतनाप्रमाणे त्या वेळी दोन महिन्याचे २४, ००० / रु ( 24 हजार रुपये ) मिळवून दिले होते. परंतु मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी पदभार स्वीकारला तेव्हा पासून कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतनासह प्रचलित कामगार कायद्याच्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांनी संघटनेच्या वतीने नोव्हेंबर २०२२ रोजी मा. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजी नगर कार्यालया समोर आमरण उपोषण केले होते.त्याची दखल घेऊन मा.विभागीय आयुक्त यांनी मा.जिल्हाधिकारी बीड यांना किमान वेतन व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी संयुक्त बैठक घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद/नगरपंचायत, सरकारी कामगार अधिकारी बीड, संघटना पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन नविन निवेदा मध्ये किमान वेतन कायदा व प्रचलित कामगार कायद्याच्या सोयी सुविधा लोडिंग करून निविदा काढण्याचे निर्देश दिले होते. त्या प्रमाणे तत्कालीन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी 
मेसर्स अशोक इंटरप्राईजेस ठाणे मुंबई या एजन्सीला डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२५ तीन वर्षासाठी घनकचरा व्यवस्थापनचे काम दिले होते. परंतु ०१ जून २०२३ रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांनी त्या एजन्सी चे काम आचनाकपणे बंद केल्यामुळे कंत्राटी सफाई कामगारांना अयोग्य व बेकायदेशीरपणे कामावरून कमी करण्यासाठी षडयंत्र केले. आज पंधरा महिने होत आहेत कंत्राटी सफाई कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे याकरिता संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड हे दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते आजतागायत अन्नत्याग उपोषण करत आहेत. त्याकडे बेजबाबदार मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांनी जानीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रकरणाचा निपटारा करावा असे निवेदन देण्यात आले आहे.जर येत्या 24 तासात प्रकरणाचा निपटारा केला नाही तर संतप्त कंत्राटी सफाई कामगार टोकाची भूमिका घेतील, त्यामुळे होणाऱ्या अनुचित प्रकारास शासन, प्रशासनातील सनदी अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय बीड प्रशासन व मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे हेच जबाबदार राहतील असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी