लक्ष्मण हाके यांना अटक करा स्वराज्य पक्षाची मागणी
सरकारने शिवभक्तांच्या भावनांचा आदर ठेवुन छत्रपती संभाजीराजे यांचा विषयी चुकीच बोलनार्या लक्ष्मन हाके यांना अटक करावी नाहीतर होणार्या परिणामांची जाबबदारी स्वीकारावी - (जिल्हाप्रमुख स्वराज्य रुपेश नाठे .)
महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणा साठी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. या मागणीसाठी मनोज दादा जरांगे गेल्या सात दिवसां पासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी व तब्यतीची विचारपुस करण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे यांची भेट घेतली या भेटीनंतर मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी चाललेल्या लढ्याला अधिक पाठबळ मिळाले आहे.
दरम्यान, ओबीसी आंदोलन कर्ते लक्ष्मण हाके यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आणि अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. हाके यांच्या या वक्तव्यामुळे मराठा समाजामध्ये व शिवभक्तां मधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
नाशीक मधे जिल्हाप्रमुख रुपेश नाठे यांचा नेत्रुत्वा मधे हाके यांच्या टीकेचा तीव्र निषेध केला गेला त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका कराल तर मराठा समाज व शिवभक्तांच्या आक्रोषाला समोरे जायला तयार रहा आणि याचा योग्य तो प्रतिवाद झेलण्याची ताकद ठेवा. स्वराज्य पक्ष यापुढे लक्ष्मण हाके यांना माफी माघीतल्या शिवाय महाराष्ट्रा मधे फिरु देणार नाही.
स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हाके यांच्याविरुद्ध आंदोलनाची तयारी सुरू केली असून, पुढील काही दिवसांत प्रशासनाने त्यांचा कारवाई नाही केल्यास मावळे स्वतः प्रशासनाच काम करतील असा इशारा दिला आहे. हाके यांनी माफी मागावी असे सर्वांनी सांगीतले.
या वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून शिवभक्तांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. छत्रपतींच्या सन्मानासाठी लढा देण्यास तयार आसल्याच यावेळी उपस्तीथ जिल्हाप्रमुख रुपेश नाठे , संपर्कप्रमुख उमेश शिंदे , युवक जिल्हाप्रमुख नितीन दातीर , महानगरप्रमुख रोशन खैरे , सहसंधटक विजय चुंभळे ,तालुका प्रमुख समाधान चव्हाण , समाधान जाधव , शरद शिंदे ,वैभव चव्हाण ,प्रसीद्धी मुकेश गोसावी , विद्यार्थी आघाडी सुघीर काळे व पदाघीकारी.
Comments
Post a Comment