महिला सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती शिंदे यांची आजाद समाज पार्टी कांशीराम बीड शहराध्यक्षपदी निवड



 बीड (प्रतिनिधी) पूरग्रस्त कॉलनी बीड येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या कु. कीर्ती शिंदे यांची आजाद समाज पार्टी कांशीराम च्या बीड शहराध्यक्षपदी निवड महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडीच्या नेहा ताई शिंदे यांच्या सांगण्यावरून खासदार ॲड. भाई चंद्रशेखर आजाद यांचे हात बळकट करण्यासाठी व महिलांचे प्रश्न शासन प्रशासन दरबारी मांडण्यासाठी बीड जिल्हाध्यक्ष आशिषकुमार चव्हाण यांच्या हस्ते बीड शहराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी आझाद समाज पक्ष जिल्हाध्यक्ष आशिष चव्हाण उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की देशामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत असून त्याला वाचा फोडण्यासाठी महिलांनी स्वबळावर लढण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद रावण हे महिलांच्या संरक्षणासाठी व भारताच्या संविधानासाठी अहोरात्र झटत असून त्यांचे हात बळकट करणे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाची प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने आझाद समाज पक्षाच्या पाठी खंबीरपणे उभे राहणे काळाची गरज आहे. यावेळी जिल्हा बीड जिल्हा कार्यकारणीचे सय्यद इनाम इनामदार,ॲड.सदानंद वाघमारे उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना कीर्ती शिंदे म्हणाले की भाई चंद्रशेखर आझाद हे दिल्लीमध्ये राहून भारतीय संविधानाची रक्षा करत असून माता भगिनींना संरक्षण देण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संसदेमध्ये आपले कार्य बजावत असून त्यांना पुढील काळात अधिकारी काम करण्याची संधी मिळावी यासाठी आपण स्वतःहून बीड शहरातील प्रत्येक वार्डामध्ये भाई चंद्रशेखर आझाद यांचे विचार तळागाळापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे सर्वसामान्य नागरिकांना महिलांना भारतीय संविधानाबद्दल जागृती करून महिलांना आत्मसंरक्षण करण्यासाठी व गोरगरीब वंचित दुर्लक्षित लोकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम या माध्यमातून प्रामाणिकपणे करणार असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या यावेळी परिसरातील मोहन वारभवण,प्रेम कोरडे,अचान वाघमारे,प्रेरणा गायकवाड,ललिता वाघमारे,पायल शिंदे,राणी बाचुटे ( शाखा अध्यक्ष पूरग्रस्त कॉलनी),आम्रपाली कोरडे,आकांशा वरभवण,सायली चक्रे,सुंदर नाना,छाया शिंदे,अंजली शिंदे,संतोष वाडमारे,कोमल वाघमारे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी