२ महिन्यांपासून दुरावस्थेतील रोहित्र आंदोलनाच्या धसक्याने दोनच दिवसांत नविन रोहित्र बसवले


लिंबागणेश:- ( दि.२८) बीड तालुक्यातील लिंबागणेश गावठाण मधील कृष्णमंदिरा शेजारील रोहित्राची २ महिन्यांपासून दुरावस्था असल्याने पावसाळ्यात रात्री अपरात्री ग्रामस्थांना जीव मुठीत धरून फ्युज टाकावे लागत असे मात्र केबल वायर जळाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. नविन केबल वायर बसवण्यासाठी महावितरणकडे साहित्य नसल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. अखेर डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि.२६ रोजी लिंबागणेश येथे रास्तारोको आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर २ महिन्यांपासून दुरावस्थेत असलेले रोहित्राच्या ठिकाणी नविन रोहित्र बसविण्यात आले. नविन रोहित्र बसविण्यात यावे यासाठी पत्रकार हरीओम क्षीरसागर, युवा नेते विक्रांत वाणी, तुकाराम गायकवाड, अंकुश गायकवाड अक्षय वाणी यांनी पाठपुरावा करत मेहनत घेतली.त्यामुळे आता वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न सुटला असुन महावितरणचे अभियंता देशपांडे व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.

रात्री अपरात्री मुठीत जीव घेऊन फ्युज टाकावे लागत असे आता प्रश्न मिटला 

 श्रीकृष्ण मंदिर शेजारील रोहित्राचा अर्ध्या गावाला वीजपुरवठा असुन संरक्षक कवच नाही,केबल वायर जळालेले, फ्युज फुटलेल्या अवस्थेत यामुळे २ महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असे.रात्री लाईनमन मुक्कामी नसल्याने ग्रामस्थांना मुठीत जीव घेऊन फ्युज टाकावे लागत असे. नविन रोहित्र बसवल्यामुळे आता वीजेचा प्रश्न मिटणार असल्याचे तुकाराम गायकवाड, अंकुश गायकवाड,अक्षय वाणी,अक्षय येडे यांनी सांगितले.

पत्रकार हरीओम क्षीरसागर यांचा पाठपुरावा; स्वखर्चाने झाडाझुडपांची साफसफाई 

श्रीकृष्ण मंदिराशेजारील रोहित्र मधुनच वीजपुरवठा असल्याने जळालेल्या केबल तशीची रोहित्राची दुरावस्था यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असे. महिनाभरापासून हुलकुडे यांची बदली झाल्याने चौसाळा येथील अभियंता देशपांडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार असुन संबंधित प्रकरणात वारंवार पाठपुरावा केला आहे.रोहित्रा भोवताली झाडाझुडपांचा वेढा असल्याने काम करताना अडचण येत असल्याचे महावितरण कर्मचारी यांनी सांगितल्यानंतर हरिओम क्षीरसागर यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून रोहित्रा शेजारील झाडांची साफसफाई केली.

महावितरणकडे साहित्याची कमतरता त्यामुळे रास्ता रोकोचा इशारा:- विक्रांत वाणी 

 गावठाणातील रोहित्रांची दुरावस्था असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. महावितरण कर्मचाऱ्यांकडे दुरूस्तीची मागणी केल्यानंतर वीजेचे साहित्य नसल्याचे सांगितले जाते त्यामुळे अखेर आम्ही रास्तारोको आंदोलनाचा ईशारा दिला.त्यानंतर २ महिन्यांपासून खराब असलेले रोहित्र काढुन नविन रोहित्र बसविण्यात आले.यामुळे ग्रामस्थांचा वीजेचा प्रश्न सुटला आहे.

मान्सुनपुर्व महावितरणची दुरूस्ती कागदावरच:- डॉ.गणेश ढवळे 

महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री उघड्यावर असल्याने अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा यामुळे महावितरणने वीज रोहित्रांची तपासणी करून पोल,वितरण पेट्या,फिडर पिलर्स यांची आर्थिंग सुस्थितीत असणे,जीर्ण झालेले वायर ,फुटलेले पिन, इन्सुलेटर बदलणे, वीज तारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आदी मान्सुनपुर्व कामे तातडीने करण्यात यावीत यासाठी १४ मे रोजी महावितरण कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी सुद्धा बहुतांश कामे कागदावरच केल्याचे दिसून येत आहे. अशी खंत डॉ.गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी