विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बीड जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक साहेब व परळीचे तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा-ॲड.माधव जाधव
परळी प्रतिनिधी -
बीड जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक साहेब हे गेल्या १५ वर्षापेक्षा जास्त काळापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध प्रशासकीय पदावर सेवेमध्ये आहेत. श्री अविनाश पाठक साहेब यांनी बीड जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी ,पुरवठा अधिकारी , निवासी ऊपजिल्हाधीकारी , अप्पर जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळामध्ये सदस्य म्हणून सेवा केली आहे.सध्या प्रमोशनवर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सेवेमध्ये काम करत आहेत.एका प्रशासकीय अधिकाऱ्यास एका जिल्ह्यामध्ये गेल्या १५ वर्षापेक्षा जास्त काळापासून सेवेत असल्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व तसेच परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे ते अतिशय स्नेहाचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे परळीचे तहसीलदार श्री वेंकटेश मुंडे यांचे जन्मगाव सारडगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड हे असून त्यांचे सर्व नातेवाईक परळी शहरांमध्ये आहेत व श्री व्यंकटेश मुंडे हे सुद्धा श्री धनंजय मुंडे यांचे जवळचे नातलग आहेत.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक साहेब व परळीचे तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे हे जर त्या पदावर कार्यरत राहिले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हे दोन अधिकारी श्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा दुरुपयोग करून सहकार्य करून बोगस मतदान करण्यात सहकार्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण आत्ता झालेल्या लोकसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात परळी विधानसभेमध्ये बोगस मतदान झाले आहे व त्या बोगस मतदानास परळीचे तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे हे सुद्धा कारणीभूत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदान होऊ नये व मतदान प्रक्रिया लोकशाही मार्गाने पारदर्शक पूर्ण पार पडण्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघातील परळीचे तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे व तसेच बीडचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर तात्काळ बदली करावी अशी मागणी ॲड माधव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय आयुक्त यांना ईमेलद्वारे केली आहे..
Comments
Post a Comment