बीड शहरातील अस्वच्छता, गटारीचे पाणी रस्त्यावर, रस्त्यावरील खड्डे, मोकाट जनावरे निष्क्रिय नगरपरिषद प्रशासनाच्या निषेधार्थ लक्ष्यवेधी " गोट्या खेळा आंदोलन" :
बीड:- ( दि.३० ) बीड शहरातील रस्त्यांवर जागोजागी कच-यांचे ढीग, पावसाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यावर, अर्धवट नाल्यांची कामे,शहरात पसरलेली दुर्गंधी त्यामुळे पसरणारे साथीचे रोग,
बीड शहरातील मान्सुनपुर्व स्वच्छता कामे कागदोपत्रीच करण्यात आली असुन शहरातील शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर त्यामुळे होणारे अपघात तसेच मोकाट कुत्र्यांचा चावा त्यामुळे नागरीकांचे जीव धोक्यात आदी मुलभूत प्रश्नांसाठी वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुद्धा नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यात कसूर करत कामांकडे दुर्लक्ष करत असुन नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.३० सोमवार रोजी नगरपरिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद बीड यांच्या दालनासमोर " गटारीचे पाणी रस्त्यावर,' रस्त्यावर खड्डे ' नगरपरिषद प्रशासन काय करतंय गोट्या खेळतंय " अशी घोषणाबाजी करत गोट्या खेळुन
लक्ष्यवेधी " गोट्या खेळो आंदोलन करण्यात आले.नीता अधारे मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद बीड यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार, बप्पासाहेब पवार ,रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष बीड, आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहराध्यक्ष सादेक सय्यद आदि सहभागी होते.
Comments
Post a Comment