बीड आयटीआय ला लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव

बीड आयटीआय ला लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव

लोकनेत्याच्या कार्याचा मरणोत्तर गौरव - प्रभाकर कोलंगडे
बीड (प्रतिनिधी)लोकनेते विनायकराव मेटे यांच्या प्रथम जयंती निमित्त दी. ३० जून २०२३ रोजी बीड येथेल आयोजित कार्यक्रमात राज्याचे मा. उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात बीड येथील आयटीआय ला लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव देण्याचे जाहीर घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे लोकनेते विनायकराव मेटे यांचे चाहते आणि शिवसंग्राम चे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांनी त्यांच्या हयातीत अनेक गोरगरीब दिन दुबळ्या आणि वंचितांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून काम केले मराठा समाजाकरिता आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक या गोष्टींचा पाठपुरावा साहेबांनी त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत केला. त्याचबरोबर एमपीएसई विद्यार्थांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था त्यांची वयोमर्यादा वाढवणे , पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवणे, विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे यासारखे अनेक कामे त्यांनी विद्यार्थांसाठी केले आज बीड येथील शासकीय आयटीआय ला त्यांचे नाव दिल्याने जो पर्यंत हे महाविद्यालय आहे तो पर्यंत लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव अजर अमर राहणार आहे. याचा मनस्वी आनंद सर्व लोकनेते विनायकराव मेटे साहेबांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना आणि शिवसंग्राम च्या मावळ्यांना झाला आहे. असे मत शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी व्यक्त केले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी