चौदाव्या दिवशीही कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधी राजेश कुमार जोगदंड यांचे नगरपरिषद कार्यालय बीड समोर अन्न त्याग आंदोलन सुरूच
बीड ( प्रतिनिधी ) नगरपरिषद बीड आस्थापनेतील अधिनस्त कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे, सफाई कामगारांसह इतर आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना जोपर्यंत मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांनी ३१आक्टोंबर २०२३ रोजी एक परिपत्रक निर्गमित केले होते. त्याची अंमलबजावणी अद्याप न करता कंत्राटी कामगारांचे शोषण सुरू ठेवलेले आहे, ते तात्काळ थांबवावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रोजंदारी मजदुर सेना या संघटनेच्या वतीने रोजंदारी कंत्राटी कामगार प्रतिनिधी तथा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड दिनांक १७ सप्टेंबर २०२४ पासून नगरपरिषद बीड कार्यालया समोर अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाचा १४ वा दिवस सुरू झाला तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कसलीही दखल नगरपरिषद बीड
प्रशासनाने घेतली नाही. जोपर्यंत सफाई कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी घेतला आहे. सफाई कामगार यांची अतिअवश्यक सेवेत गनना होते. नगरपरिषद बीड आस्थापनानेत त्यांच्या अधिनस्त वेगवेगळ्या कंत्राटदारामार्फत कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्यात करारनामा करून कार्यारंभ आदेश दिला जातो परंतु त्याची अंमलबजावणी न करता कंत्राटी कामगारांचे मागील २२ ते २३ वर्षापासून शोषण करून त्यांना त्यांच्या मुलभूत हक्क व अधिकारा पासून वंचित ठेवले
आहे. आणि चोराच्या उलट्या बोंबा या म्हणी प्रमाणे मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांनी सफाई कामगारांनवर व कामगार नेत्यांन वर ०२ ऑगस्ट २०२३ रोजी खोटा गुन्हा दाखल केला. नगरपरिषद बीड मधील मागील २२ ते २३ वर्षात कंत्राटी कामगारांचा हडप केलेला पगार, ईपीएफ ची रक्कम व्याजासह कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यातून देण्यात यावी, सदर शोषण प्रकरणी सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून या भ्रष्टाचार घोटाळ्यातील शासकीय अपहार केलेली रक्कम व्याज अधिक दंडासहित वसूल करण्यात यावी.
सफाई कामगारांना नोकरीच्या व पगाराच्या सलगतेसह पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे या मागणीसाठी अन्नत्याग उपोषणाचा १४ वा दिवस सुरू झाला आहे. मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई व जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी प्रकरणाचा निपटारा करण्याचे निर्देश देऊन अन्नत्याग उपोषण कर्ते भाई राजेशकुमार जोगदंड यांना उपोषणा पासून परावृत्त करावे असे निर्देश दिले.
त्या प्रमाणे कारवाई करावी या मागणीसाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी राजेश कुमार जोगदंड हे नगरपरिषद बीड कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करत आहेत, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करून सफाई कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घेत नाहीत तोपर्यंत मा़झे आंदोलन चालूच राहणार आहे, या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांच्यावरच राहील.
सदरिल आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते तथा संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर करत आहेत.
अशी माहिती संघटनेच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment