बीड शहरा बचाव मंचने प्रश्न हाती घेतला की लगेच नगरपालिकेने घेतली दखल

 जेसीपी च्या साह्याने क्रांती कॉलनी, मित्र नगर भागातील कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरुवात 

बीड प्रतिनिधी – बीड शहरात अनेक नागरी समस्या आहेत या समस्या बीड बचाओ मंच स्थापन करून अगोदर समजून घेतल्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या व आवश्यक अशा प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या प्रयत्नामुळे नगरपालिका प्रशासन आता हळूहळू कुठेतरी काम करताना दिसत आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. अनेक सकल भागामध्ये पाणी जमा होते, रस्त्यात खड्डे पडले आहेत. या सर्व गोष्टींकडे आता सुजान नागरिक लक्ष घालून प्रश्न सोडण्यासाठी बीड शहर बचाव मंचच्या सर्व टीमला संपर्क करत आहेत. व काही प्रमाणात का होईना त्या समस्या सोडवायला सुरुवात झाली आहे त्यामुळेच हे काम होऊ शकले त्यामुळे नागरिकांनी आभार देखील मानले आहे. त्याचे झाले असे की बीड शहर बचाव मंच अंतर्गत सदस्य डॉ. अशोक मसलेकर व नितीन जायभाये यांच्या संयुक्त प्रयत्नातून दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी क्रांती कॉलनी, मित्र नगर येथील चार प्लॉट मधील घनकचरा साफ करून कचऱ्याचे ढीग जेसीबीच्या साह्याने उचलायला केली सुरुवात. बीड शहर बचाव च्या सर्व पदाधिकारी टीमचे व येथील रहिवाशांनी डॉ.अशोक मसलेकर व नितीन जायभाये यांचे आभार व्यक्त करून नगरपालिकेबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी