लोकशाही पत्रकार संघाच्या माजलगाव तालुका सचिवपदी समाधान गायकवाड यांची निवड
माजलगाव प्रतिनिधी
दि.२४ सप्टेंबर रोजी लोकशाही पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यालयामध्ये लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापकीय अध्यक्ष भागवतजी वैद्य व ग्रामपंचायत सरपंच विकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सखाराम पोहिकर यांच्या उपस्थितीमध्ये माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथे लोकोपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबवणारे दैनिक युवतीराजचे तालुका प्रतिनिधी समाधान गायकवाड यांची लोकशाही पत्रकार संघाच्या माजलगाव तालुका सचिवपदी निवड करण्यात आली व त्यांना माजलगाव तालुका सचिव पदी निवड झाल्याबदल नियुक्ती पत्र देताना लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापकीय अध्यक्ष भागवतजी वैद्य व ग्रामपंचायत संरपंच विकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष व दैनिक विदर्भ सत्यजित व साय दैनिक साई संध्याचे बीड जिल्हा प्रतिनिधी सखाराम पोहिकर यांच्या उपस्थितीमध्ये हे नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नियुक्ती पत्र घेताना समाधान गायकवाड म्हणाले की लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापकीय अध्यक्ष भागवतजी वैद्य व ग्रामपंचायत सरपंच विकास रुमितीचे प्रदेश उपाध्याक्ष सखाराम पोहिकर यांनी माझ्यावर माजलगाव तालुक्याच्या सचिव पदाची जबाबदारी दिली आहे त्या पदाचा मी वापर जनसामान्य माणसाच्या समस्या शासनदरबारी मांडुन सोडवण्यासाठी तसेच समाजातील सर्व दुबळ्या गोर गरीबाना न्याय देण्यासाठी मी सदैव तत्पर सेवा देण्याच काम करु लोकशाही पत्रकार संघाच जाळ संपूर्ण माजलगाव तालुक्यात खेडोपाडी जाऊन लोकशाही पत्रकार संघाच्या काम काय आहे याची माहिती देण्यात येईल तसेच पत्रकारांंचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या पुढील काळात लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने मार्गी लावण्यासाठी आपणं सतत प्रयत्नशील राहु असे नियुक्ती पत्र घेताना आपले मत व्यक्त केले. यावेळी लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment