खरा आदिवासी, खोटा आदिवासी ईगतपुरी- त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीआधीच घमासान
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक तोंडावर आलेली असुन सर्वच मतदारसंघात इच्छुक उमेदवार,पक्ष,युती व आघाडी आदीनीं विविध माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचण्याचा धडाका लावला आहे.
ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ही निवडणुक पुर्व हालचालीनां वेग आला असुन यावेळी इच्छुक उमेदवाराच्यां संख्येत मोठीच वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
निवडणुकी पुर्वीच या मतदारसंघात स्थानिक विरुद्ध उपरे हा वाद रंगत होता.आता या वादात खरा आदिवासी विरुध्द खोटा आदिवासी या वादाने जोर पकडलेला आहे.
बोगस आदिवासी प्रमाणपत्र मिळवुन आदिवासी बांधवाच्यां हक्कावर डल्ला मारण्याचे अनेक प्रकार यापुर्वी उघड झालेलेच आहे.
तसेच आदिवासी बांधवाच्यां जमिनी कवडीमोल भावाने विकत घेण्यासाठी खोटे दस्तावेज बनवुन दाखले मिळवल्याचेही असंख्य प्रकार चव्हाटयावर आलेले आहेत.
आदिवासी बांधवामध्ये खोटया प्रमाणपत्राच्या माध्यमातुन अनेकानीं घुसखोरी केलेली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात हा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरु लागला आहे.
आर्थिक ताकदीच्या बळावर धुमकेतुप्रमाणे एक नवीन उमेदवाराची या मतदारसंघात प्रवेश झाला असुन, आर्थिक बळावर त्यांनी अनेकानां आपलेसे केल्याचे सनसनाटी आरोप प्रतिस्पर्धी उमेदवार करत आहे.
या कथित उमेदवाराच्यां जातीचा मुद्दा अलीकडे चर्चेचा झाला असुन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे या नेत्यांसह अनेकानीं या कथीत इच्छुक उमेदवाराच्या जातीवर सवाल केले असुन सदर उमेदवार हा बोगस आदिवासी असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान यामुळें ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात खमंग चर्चा सुरु झाली असुन हा मुद्दा हळुहळू तापायला प्रारंभ झाला आहे.
Comments
Post a Comment