अष्टभुजा सार्वजनिक दुर्गोत्सवच्या अध्यक्षपदी विशाल आवाड तर उपाध्यक्ष पदी राजेभाऊ जाधव यांची निवड


परळी (प्रतिनिधी): गंगासागर नगर येथील चाळीस फूट रोड येथे अष्टभुजा सार्वजनिक दुर्गोत्सव ची कार्यकारणी ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदी विशाल आवाड तर उपाध्यक्ष पदी राजेभाऊ जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष: किशोर जाधव, सचिव: योगेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष: बळिराम नागरगोजे, तर कार्यक्रमाच्या संयोजक पदी संतोष चौधरी, सुजित क्षीरसागर,शाम आवाड मार्गदर्शक: मोहन राजमाने, विष्णू लिखे, बाबू भालेराव, प्रशांत दराडे, भागवत दौंड, शिवगण बहादुरे, सोमनाथ क्षीरसागर, केशव जाधव, विश्वनाथ कापसे, अनंत फल्ले, यांच्या सह राजेश शिंदे, गोविंद गरड, सोमनाथ पांचाळ, विश्वनाथ सावंत, शिवराज वाकडे, कृष्णा कदम, गजानन थळकरी, रवी खोसे, कृष्णा सातपुते, कपिल शिंदे, संतोष मस्के, दीपक खाडे, बालाजी क्षीरसाठ, बालाजी शिंदे, रुपेश जाधव, नरसिंग पौळ, विष्णू आटुळे, बालाजी डांगे, विशाल जाधव, लखन कापसे, महादेव गिराम, पप्पू पौळ, आदी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी सार्वजनिक दुर्गोत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार असुन सामाजिक उपक्रम व समाज प्रबोधन पर कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे नूतन कार्यकारणी च्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी